औरंगाबाद : अभ्युदय फाऊंडेशनच्या कार्यालयात लोकांनी आणून दिलेल्या मदतीचे ढीग.
औरंगाबाद : अभ्युदय फाऊंडेशनच्या कार्यालयात लोकांनी आणून दिलेल्या मदतीचे ढीग. 
मराठवाडा

दुष्काळाचे दुःख उरामधी, चिंता करितो विश्‍वाची!

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद : "विश्‍वचि माझे घर' अशी शिकवण देणारे ज्ञानेश्‍वर माऊली, उपेक्षितांच्या मुखी पंचपक्वानाचा घास घालणारे एकनाथ, "चिंता करितो विश्‍वाची' म्हणणाऱ्या रामदासांपासून कित्येक संतांनी आपल्या शिकवणीतून घालून दिलेली सहिष्णुतेची परंपरा मराठवाडा विसरलेला नाही, याची जाणीव पदोपदी येत आहे. दुष्काळाचे दुःख उरात तसेच दाबून संपूर्ण मराठवाड्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे अस्मानी संकटात सापडलेल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे

औरंगाबाद, जालन्यासह नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, बीड आणि परभणीतून लोक भरभरून मदत देत आहेत. ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. जीवनावश्‍यक वस्तू, खाद्यान्नाच्या पाकिटांबरोबरच कपडे, पांघरुण, औषधीचे ट्रक ठिकठिकाणांहून रवाना होत आहेत. त्याशिवाय चादरी, चटई, दूध पावडर, बिस्कीटे, बेबी फूड, टॉवेल, कपडे व इतर जीवनावश्‍यक गोष्टींची मदत करण्यासाठी गावोगाव मदतफेऱ्या निघत आहेत. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण संस्थाचालकांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. तरुणवर्ग हिरिरीने या मदतीचे वर्गीकरण, वाटप करण्यात आघाडीवर आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनी कष्टाची कमाई करत आपला खारीचा वाटा उचलला आहे. मराठवाड्यातल्या गावागावांतून केवळ हळहळ व्यक्त न होता अगदी शेतकरी, कष्टकऱ्यांनी सहानुभूतिपूर्वक फूल ना फुलाची पाकळी मदत देऊ केली आहे.

हरेक जिल्हा सरसावला

  • औरंगाबाद जिल्ह्यात अभ्युदय फाउंडेशन, मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, हेल्प रायडर्स ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनकल्याण समिती, के. के. ग्रुपसह अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे मदत गोळा करून ट्रकने रवाना करण्यात आली आहे. अभ्युदयतर्फे सोमवारीही मदतीचा आणखी एक ट्रक रवाना केला जाणार आहे. आरोग्य विभागाचे २३ डॉक्टरांचे पथक औषधींच्या ट्रकसह सांगलीला रवाना झाले आहे.
  • उस्मानाबाद जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक संस्था, शासकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने नागरिकांनी घरोघरी जाऊन साहित्य जमा केले. महसूलच्या अधिकाऱ्यांनी निधी जमा करून जीवनावश्‍यक वस्तू खरेदी केल्या. कळंबला रास्त भाव दुकानदार संघटनेने कपडे, बिस्किटे पाठविली. विद्यार्थ्यांनी निधी संकलन केले. भूम, वडगाव (गांजा, ता. लोहारा), मुरूम, येणेगूर (ता. उमरगा), परंडा येथून मोठ्या प्रमाणात मदत पाठविण्यात आली आहे.
  • पाणीटंचाईच्या काळात मदत करणाऱ्या सांगलीकरांना मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केल्यानंतर लातूरकरांनी भरभरून मदतीचा ओघ सांगलीकडे पाठविला आहे. जिल्हा परिषदेने 10 लाखांची मदत केली आहे. यात 5 लाख रुपयांचे विद्युतपंप आणि हातपंप दुरुस्तीचे साहित्यही पाठविले आहे. रायगड ग्रुप, संत कक्कया बचत गट, व्यापारी महासंघासह विविध गावांतूनही मदत रवाना केली जात आहे.
  • बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस दोन दिवसांपासून सांगलीत तळ ठोकून आहेत. आमदार संगीता ठोंबरे यांनी एक महिन्याचे वेतन दिले. नांदूरघाट, सारणी, आनंदगाव (ता. केज), डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या गावांनी ट्रक, जीपद्वारे कपडे, धान्य, साहित्य रवाना केले आहे. किल्लेधारूर, अंबाजोगाई शहरांतूनही एकेक लाख रुपयांची मदत गोळा झाली. धारूरचे युवक दोन ट्रक मदत साहित्य घेऊन गेले आहेत. शिरूर कासारमधून तीन टन धान्य, परळीतून पाच लाखांचा मदत निधी जमा झाला आहे. बीडच्या दोन मदरशांनीही आपल्या परीने हातभार लावला आहे.
  • जालना शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फेरी काढण्यात येत आहेत. यात आर्थिक मदत, धान्य, वस्त्र आदींचे विविध सामाजिक संघटना, सजग ग्रामस्थांच्या वतीने संकलन केले जात आहे. परतूर शहरासह तालुक्‍यातील आष्टी, लिखित पिंपरी, धामणगाव, संकनपुरी, घनसावंगी तालुक्‍यातील पिंपरखेड बुद्रुक आदी ठिकाणी ठिकाणी मदत फेरी काढण्यात आली.
  • नांदेड शहरात वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलतर्फे पूरग्रस्तांकरिता 51 हजारांची मदत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. युवक कॉंग्रेसने शहरात मदत फेरी काढून निधी संकलन केले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने पूरग्रस्तांकरिता कपडे, अन्नधान्य संकलन करण्यात आले.
  • हिंगोली नगरपालिकेने मदत फेरी काढून रोख रक्कम, धान्य, कपडे जमा केले. सेनगाव, आखाडा बाळापूर येथेही विविध शाळा, महाविद्यालय, गावकऱ्यांतर्फे मदत फेरी काढण्यात आली. जमा झालेली मदत पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे.
  • परभणीत एक दिलासा फाउंडेशनच्या वतीने सोनपेठ (जि. परभणी) येथे शनिवारी (ता.दहा) मदत फेरी काढण्यात आली. जमा झालेली मदत पूरग्रस्तांना पाठविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT