गुन्हा
गुन्हा  
मराठवाडा

बालानगर येथे गांजाचे झाड जप्त

सकाळ वृत्तसेवा

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : बालानगर (ता. पैठण) येथे एकाने घराच्या अंगणात गांजा विक्री करण्याच्या इराद्याने झाड लावल्याची माहिती एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस उपअधीक्षक गोरख भांबरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 11) घटनास्थळी छापा टाकून सहा किलो गांजाचे झाड जप्त जप्त केले. त्याची किंमत 49 हजार 400 रुपये असून तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरारी झाला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोमवारी (ता.11) गुप्त खबऱ्यामार्फत सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांना बालानगर येथे जमील शहा शौकत शहा याने आपल्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी पैठणचे पोलिस उपअधीक्षक गोरख भांबरे व सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी दोन पंचांना सोबत घेऊन जमील शहा (वय 48, रा. बालानगर, ता. पैठण) याच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना पाहताच तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला; मात्र पोलिसांनी गांजाच्या झाडाचा शोध घेतला असता, त्यांना घराच्या अंगणात अंदाजे पाच ते सहा फूट उंचीचे एक गांजाचे झाड आढळून आले.

त्या झाडाचे व पानाचे वजन 6 किलो 200 ग्रॅम भरले. त्याची अंदाजे किंमत 49 हजार 400 इतकी असून, पोलिस नाईक जाकेर शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी जमील शहा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार विद्या झिरपे, पोलिस जमादार संपत दळवी, जाकेर शेख, विजय पवार, रामेश्वर तळपे, बाळासाहेब चव्हाण करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT