Market Committee will give free meals to farmers in fodder camp from today
Market Committee will give free meals to farmers in fodder camp from today 
मराठवाडा

चारा छावणीत शेतकऱ्यांना आजपासून बाजार समिती देणार मोफत जेवण 

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करमाडला 15मे पासून चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. या छावणीत एक हजार ते आकराशे जनावरे आली आहेत. या जनावरांसोबत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारपासून (ता.18) बाजार समितीतर्फे एका वेळचे जेवण देण्यात येणार आहे. असा निर्णय शुक्रवारी (ता.17) बाजार समितीच्या संचालकांनी बैठकीत घेतल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. 

दुष्काळामूळे जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. शासनातर्फे जिल्हात अनेक ठिकाणी चारा छावणी सुरु करण्याचे आवाहनानंतर जिल्हत 10 ते 15 चारा छावण्या सुरु आहेत. जनावरासाठी आता बाजार समितीने पुढाकार घेत करमाड येथील उपबाजारपेठे येथे चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. एक हजार ते दिड हजार जनावारांची व्यवस्था होईल. अशी सुविधा या छावणीत करण्यात आली आहे. बाजार समिती सध्यास्थितीत 1 हजार ते आकराशे जनवारा आहेत. तर साडेतीनशे ते 400 शेतकरी जनावराचा सांभाळ करण्यासाठी आले आहेत. या शेतकऱ्यांनाही एक वेळचे जेवण देण्याचा प्रस्ताव होतो. तो प्रस्तावर संचालक मंडळाच्या महिन्याकाठी होणाऱ्या बैठकीत मांडण्यात आला. यासाठी करमाड येथील एका खानवळ चालकांशी बोलणे झाले आहेत. तो हॉटेलचालक शेतकऱ्यांना छावणीच्या ठिकाणी जेवण नेऊन देईल. असेही सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले. या बैठकीस कॉंग्रेसचे संचालक तथा माजी सभापती संजय औताडे सोडता सर्व संचालक उपस्थित होते. 

बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहे. यामुळेच करमाड उपबाजारपेठ येथे चारा छावणी सुरु करण्यात आली. तेवढ्यावरच न थांबता आम्ही शेतकऱ्यांसाठी एक वेळ जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी संचालक मंडळासमोर प्रस्ताव मांडला होता. यात तो प्रस्ताव मंजुर झाला. 
- राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT