gopinathmunde
gopinathmunde 
मराठवाडा

दवणगावला होणार गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक

हरी तुगावकर

लातूर : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दवणगाव (ता. रेणापूर) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक भव्य असणार आहे. या करीता शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जणांची समिती गठीत केली आहे. ही समिती या स्मारक उभारणीच्या बांधकामाचा खर्चाचा आराखडा मंजूर करणे व बांधकामावर सनियंत्रण ठेवणार आहे. दिवंगत मुंडे यांचे हे लातूर जिल्ह्यातील पहिले स्मारक असणार आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे व लातूर जिल्ह्याचे संबंध चांगले राहिले आहेत. यात  रेणापूर तालुक्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. कै. मुंडे यांच्यावर तत्कालीन रेणापूर विधानसभा मतदार संघाने भरभरून प्रेम केले. सलग सहा वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आले. या मतदार संघातील बहुतांश भाग हा लातूर जिल्ह्यातील असला तरी देखील गोपीनाथ मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. या मतदारसंघात रेणापूर तालुका, अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावाचा समावेश होता. या मतदारसंघातील प्रत्येक गावाची माहिती त्यांना माहिती होती. त्यातील एक गाव म्हणजे दवणगाव. हे गाव त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे राहिले, त्यांनीही या गावाला प्रेम दिले. या रेणापूर मतदारसंघात त्यांचे स्मारक व्हावे या करीता भाजपचे नेते रमेश कराड यांनी संकल्पना मांडली. ही कल्पना दवणगावचे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब घुले यांनी स्विकारली. त्यांनी या स्मारकासाठी तीन महिन्यापूर्वी एक प्रस्ताव शासनाला पाठवला होता. यातून शासनाने आता जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली २३ जणांची समिती स्थापन केली आहे.

या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वस्तूसंग्रहालयांतर्गतत कार्यरत जिल्हास्तरीय अधिकारी, नगररचनाकार, कला संचालनालयअंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय अधिकारी, भाजपचे नेते रमेश कराड, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगीरे, दवणगाव आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब घुले, पंचायत समितीच्या सदस्य चंद्रकला इंगोले, दवणगावच्या सरपंच स्मिता नागरगोजे, उपसरपंच हनुमंत नागरगोजे, गरसुळीचे उपसरपंच संतोष चव्हाण, किसन क्षीरसागर (मोरवड), नवनाथ माने (चाडगाव), बालाजी राठोड (फरदपूर), रेणापूरचे तहसिलदार व जिल्हा नियोजन अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती या स्मारक उभारणीच्या बांधकामाचा खर्चाचा आराखडा मंजूर करणे व बांधकामावर सनियंत्रण ठेवणार आहे.

पंढरपूरच्या विठोबाला पाहण्यासाठी ज्या प्रमाणे गर्दी होते तशीच गर्दी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन रेणापूर मतदारसंघात आले की लोक करीत असत. दवणगाववर त्यांनी भरभरून प्रेम केले. त्यांची प्रेरणा पुढच्या पिढीला कायमस्वरुपी मिळावी या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात येणार आहे. दवणगाव हे लातूर अंबाजोगाई रस्त्यावर पळशीपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. गावठाणच्या पाच एकर जागेवर हे स्मारक उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या करीता ग्रामस्थांचेही स्वइच्छेने सहकार्य घेतले जाणार आहे. रेणापूर मतदारसंघातील हे पहिले स्मारक असणार आहे.
- डॉ. बाबासाहेब घुले, अध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, दवणगाव, ता. रेणापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT