monsoon
monsoon monsoon
मराठवाडा

ऑगस्ट अखेरपासन मान्सून दाखविणार रंग!

मधुकर कांबळे

औरंगाबाद: व्रत वैकल्याचा, सणांचा महिना म्हणून श्रावण ओळखला जातो. धरतीने हिरवा शालू पांघरलेला असतो. या महिन्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतात. यंदा मात्र खऱ्‍या अर्थाने मॉन्सून ऑगस्टअखेरीस आपले रंग दाखविणार आहे. त्यामुळे श्रावणातही हलक्या नव्हे तर मुसळधार सरी कोसळतील, असा अदाज भौतिकशास्त्रज्ञ व हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीचे (पाषाण, पुणे) माजी शास्त्रज्ञ प्रा. जोहरे गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती देत आहेत. मराठवाड्यात सध्‍या पावसाने ओढ दिली आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, यंदा खऱ्या अर्थाने मॉन्सून ऑगस्टअखेरीस महाराष्ट्रात येईल. यावर्षीही ढगफुटीची संख्या वाढेल. सध्याचा पाऊस मॉन्सूनचा असल्याचे सांगितले जात असले तरी तो मान्सूनपूर्व आहे. मॉन्सूनपूर्व, मॉन्सूनचा आणि मान्सुनोत्तर अशी तीन टप्प्यांत पावसाची वर्गवारी करता येऊ शकते. मॉन्सूनपूर्व किंवा ग्रामीण शब्दात वळिवाचा पाऊस म्हणतात. साधारणत: मार्च ते मे आणि मॉन्सून पॅटर्न बदलल्याने सध्या जून, जुलै व अनेकदा ऑॅगस्टमध्येही तो होतो. वातावरणातील तापमान, हवेचा दाब, आर्द्रता आदी घटकांच्या लक्षणीय बदलामुळे अस्थिरता वाढल्याने हा पावासाचा हा पॅटर्न बदलतो.

कसा ओळखावा मान्सूमपूर्व पाऊस?-

वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळीवारे, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, विजांचे तांडव, गारपीट, आकाशात ढगांचे पुंजके, वेगवेगळ्या रंगछटा दिसणे ही मान्सूनपूर्व पाऊस ओळखण्याची साधी लक्षणे किंवा खूणा आहेत. साधारणत: हा पाऊस दोन प्रकारे कोसळतो. दिवसभर उष्णता वाढल्यामुळे दुपारी बारानंतर आणि अधिकतर दुपारी दोननंतर हवा तापल्याने ऊर्ध्व झोत निर्माण होत खालून वरच्या दिशेने हवेचा प्रवास होऊन अस्थिरतेमुळे पाऊस पडतो. तर कधी सूर्यास्तानंतर हवा थंड होऊन वरून खालच्या दिशेने येऊ लागल्याने ढगात घुसळण होत अस्थिरतेने रात्री ते पहाटे पाऊस पडतो. दुपारी तीन- चारच्या सुमारास क्युमोलो निम्बस (क्युमोलो म्हणजे ऊर्ध्व दिशेने वाढत जाणारे आणि निंबस म्हणजे पाणी धारण केलेले ढग) वरच्या दिशेने जाताना दिसतात. सध्या असे चित्र पाहायला मिळते, असे प्रा. जोहरे म्हणाले.

मान्सून स्थिरावल्यानंतर…

मॉन्सून स्थिरावतो त्यावेळी आकाश एका रंगछटेमध्ये काळपट दिसते. पाण्याने भरलेले ढग पसरट दिसतात. त्यावेळी ऊन पावसाचा खेळ नसतो. मॉन्सूनपूर्व पाऊस कुठे पडतो तर कुठे पडतच नाही. मात्र 'निबोस्ट्रेटस' ढग सर्वत्र पसरलेले असल्याने मान्सूनच्या पावसाची सर्वदूर रिपरिप सुरू असते.

अवकाळी पाऊस कधी?

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत होणारा पाऊस अवकाळी असतो. तोही मॉन्सूनपूर्व किंवा मॉन्सून पश्चात पावसासारखा विजांचे लखलखाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळतो. अनेकदा गारा पडतात किंवा क्वचित गारपीट अर्थाच गारांचा सडाही पडतो. मॉन्सूनोत्तर किंवा परतीचा पाऊस मॉन्सून पश्चात म्हणूनही ओळखला जातो. यात मॉन्सूनपूर्व पावसाप्रमाणेच सर्व लक्षणे वातावरणात असतात. ढोबळ मानाने याचा कालावधी ऑक्टोबर, नोव्हेंबर व कधी डिसेंबरमध्येही अवकाळी पाऊस होतो. मात्र, मॉन्सूनपूर्वच्या तुलनेत या पावसाची तीव्रता कमी असते, असे प्रा. जोहरे म्हणाले.

यंदा दिवाळीतही पाऊस -

यंदा मॉन्सूनच्या सरी उशिरा कोसळणार असल्या तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही यंदा पाऊस राहील. दिवाळी, ख्रिसमसही सणही पावसात साजरे करावे लागतील. सध्या पाणीसाठ्याची सोय पाहून शेतकऱ्यांनी पेरणीचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा, तसे केल्यास दुबार पेरणीचे संकट टळेल, असा सल्ला प्रा. जोहरे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT