photo 
मराठवाडा

फिरत्या चहा दुकानाने साधली ‘प्रगती’

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील वाढलेले जागेचे भाव, वाढलेला दुकानाचा किराया यामुळे सर्वसामान्यांना व्यवसाय थाटणे अवघड बनले आहे. इच्छा असतानाही व्यवसाय करता येत नसल्याने बेरोजगारांमध्ये वाढ होत आहे. मात्र, येथील राजू जैस्वाल यांनी यावर मात करत दुचाकीवरच ‘प्रगती चहा विक्री सेंटर’ नावाचे चहाचे दुकान थाटले आहे. दिवसभर ठिकठिकाणी चहा विक्री केली जात असून यातून रोजगार शोधला आहे. चहाच्या विक्रीतून घरसंसारासही आर्थिक मदत होत असल्‍याने हाच व्यवसाय आता कायमस्‍वरूपी झाला आहे.

शहरातील राजू जैस्‍वाल हे अनेक वर्षांपासून चहा विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, मुख्य बाजारपेठेत चहा विक्रीसाठी जागा मिळणे अवघड झाले आहे. तसेच छोट्या व्यवसायिकांना ते परवडणे शक्‍य नाही. दररोज चौकात गाडा लावल्यावर वाहतूक शाखेच्या पोलिसांची ते हटविण्याची कधी मोहीम सुरू होते याची निश्चिती नसते. त्यामुळे व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे, लागते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली तरी नुकसान झाले नाही पाहिजे, यासाठी त्यांनी दुचाकीवर चहा विक्री करण्याचा निर्णय घेतला.  

दुचाकीवर चहा विक्री

यासाठी दुचाकीच्या सीटवर एक लोंखडी फळी बसवून त्‍यावर स्‍टोव्ह ठेवला आहे. तसेच दुचाकीच्या हॅण्डलला पिशव्या अडकवून त्‍यात साखर, पत्ती, दूधपुडे, चहा व कॉफीसाठी लागणारे सर्व साहित्‍य, ग्लास ठेवण्यात आले आहेत. सावलीसाठी मोठ्या छत्रीचा वापर करत आहेत. शहरातील विविध चौकात थांबून चहाची विक्री केली जात आहे. या चहाला ‘प्रगती चहा विक्री सेंटर’ असे नाव दिले आहे. चहाच्य विक्रीतून आलेल्या रकमेत संसाराचा गाडा चालविला जात असल्याचे श्री. जैस्‍वाल यांनी सांगितले.

कोणत्याही ऋतुत चालणारा व्यवसाय

राजू जैस्वाल यांनी चहा विक्रीचा व्यवसाय थाटला. चहा विक्री कोणत्याही ऋतुत चालते.  शिवाय कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो. पहाटेपासून ग्राहक मिळत असल्याने यातून चांगला नफा मिळतो. त्यामुळे अनेकजण चहाची टपरी टाकून व्यवसाय सुरू करतात. मात्र, चहाची टपरी टाकायची म्हटले तरी जागा मालक भाडे आकारतो. यासाठी शासनाने चहाटी टपरी टाकणाऱ्या व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

अनेक वर्षांपासून चहा विक्री

अनेक वर्षांपासून चहा विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, दुकान थाटण्यासाठी स्‍वंतत्र जागा नाही. चौकातील दुकानाचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे दुचाकीवर चहा विक्री करण्याचा निर्णय घेतला. शहरातील गणपती चौकासह इतरही ठिकाणी थांबून चहाची विक्री करतो.
-राजू जैस्‍वाल, चहा विक्रेते

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : पुण्यातील माणिक बागेत अपघात; युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT