वाहतुक समस्येची पाहणी केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना सुचना देताना खासदार इम्तियाज जलील.
वाहतुक समस्येची पाहणी केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना सुचना देताना खासदार इम्तियाज जलील. 
मराठवाडा

वाहतूक नियोजनासाठी खासदार रस्त्यावर 

मनोज साखरे

औरंगाबाद- शहरातील वाहतुकीची समस्या एकीकडे गंभीर असतानाच खासदार इम्तियाज जलील वाहतूक नियोजनासाठी शुक्रवारी (ता. एक) रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना वाहतूक नियमन व कारवाईबाबत सूचना दिल्या. 

गत अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्ता, पार्किंग, वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्‍न कायम आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून वरवरचे प्रयत्न सुरू असल्याने समस्या अजूनही जटीलच आहे. त्यामुळेच खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शहरातील वाहतूक समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी विविध भागात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वाहतुक विभागाचे सहायुक आयुक्त दिनेशकुमार कोल्हे, पोलिस निरीक्षक दादासाहेब सिनगारे होते.

जालना रस्त्यासोबतच जुन्या औरंगाबादेतही त्यांनी पाहणी केली. 
पंचायत समितीसमोरील चौकात अखंड दुभाजक तोडण्याची सूचना त्यांनी केली. तसेच शहागंज भाजी मंडईत पाहणी करून त्यांनी हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांबाबत निर्णय लवकरच घेणार असल्याचे सांगितले. शहरात पार्किंगचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करा अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या. तसेच शहरातील काही रिक्षा थांबे खासदार निधीतून बांधण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात वाहतूक विभाग, महापालिका आणि आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT