file photo
file photo 
मराठवाडा

हिंगोलीत सोमवारी कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण, तर एकाचा मृत्यू

राजेश दारव्हेकर

हिंगोली -  जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) नऊ नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्हआला असून एका सामान्य रुग्णालयातील एका ६५ वृद्धाचा कोरोना आजाराने मृत्यू  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे. 

 प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नऊ रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये नऊ रुग्ण हे अँटीजन टेस्टमध्ये आढळून आले आहेत.यामध्ये हिंगोली परिसर तीन, कळमनुरी परिसर चार, औंढा परिसर दोन, एकूण असे नऊ रुग्ण आढळून आले आहेत.

सोमवारी एकूण १६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी

सोमवारी एकूण १६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.आजपर्यंत एकूण बारा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.आज एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची संख्या तेरा झाली आहे.यातील बरे झालेल्या मध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली येथील१४,वसमत कोरोना सेंटर येथील एक, कळमनुरी सेंटर येथील एक असे सोळा रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद वसाहत चार, जिजामाता नगर हिंगोली एक, गाडीपुरा एक, कोथळज एक, पिंपळ खुटा एक, शास्त्री नगर वसमत एक, औंढा नागनाथ दोन, सेनगाव दोन, वसमत एक, कळमनुरी एक, वसमत कलंबा एक, असे सोळा रुग्ण बरे झाले आहेत.

आजपर्यंत कोरोनाचे  एकूण ११८७ रुग्ण

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे  एकूण ११८७  रुग्ण झाले असून, त्यापैकी ८०५  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोना मुळे जिल्ह्यात आतापर्यंत तेरा व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी सांगितले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या पैकी नऊ रुग्णांची प्रकृती अति गंभीर असल्याने त्यांच्यावर ऑक्सिजन सुरु आहे.तर तीन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायप्यापवर ठेवण्यात आले आहे.बारा रुग्णाची प्रकृतीचिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT