Tuljabhavani Mata Mandir Closed On Janta Curfew 
मराठवाडा

तुळजापुरात जनता कर्फ्यू, तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिर रविवारी (ता.१४) प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे पूर्णतः बंद होते. मंदिरातील सर्व धार्मिक विधी परंपरेने पार पडले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनता कर्फ्यू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते. तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी त्यामध्ये पहाटेचे चरणतीर्थ, देवीची नित्योपचार अभिषेक पुजा पार पडली. तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाने सॅनिटायझर तसेच स्वच्छता ही सकाळी  केली.

तुळजाभवानी मंदिरात केवळ देवीचे पुजारी तसेच मंदिराचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते. १६ नोव्हेंबर २०२० रोजी दिवाळी पाडव्यापासुन तुळजाभवानी मंदिर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे भाविकांसाठी उघडले. तसेच मंदिरात कोरोनामुळे अनेक उपाययोजना केल्या. श्री.दिवेगावकर यांनी धार्मिकस्थळे ही रविवारी बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे आज मंदिर भाविकांसाठी पूण॔पणे बंद होते. मंदिरामध्ये सर्व परीसर भाविकांविना होता.

मंदिर समितीने मंदीरातील बहुतांशी भागात सॅनिटायझर फवारले होते. तसेच मंदिरात स्वच्छता ही करण्यात आली होती. तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सौदागर तांदळे यांच्या सुचनेनुसार मंदिरात सर्व उपाययोजना करण्यात आल्या. धार्मिक व्यवस्थापक सिद्देश्वर इंतुले, मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्यासह मंदिरातील सर्व कम॔चारी सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यरत होते. दरम्यान काही मोजक्या भाविकांना मंदिर बंद असल्याच्या सूचना ध्वनिवर्धकाद्वारे देण्यात येत होत्या.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT