Pankaja Munde
Pankaja Munde 
मराठवाडा

हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी स्वत: लोकसभा लढवावी: पंकजा

सकाळवृत्तसेवा

बीड : आपण नेतृत्व करत असल्याने आपल्याला आरशात चेहरा पहायलाही वेळ मिळत नाही. मात्र, राज्याचे नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात, वजन सांभाळतात असा चिमटा काढत स्वत: मागच्या दाराने येतात असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. हिंमत होती तर स्वत: लोकसभा का लढविली नाही, उमेदवारी दाखल करायला आजचा एक दिवस शिल्लक आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा, असे आव्हान भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. 

भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी निघालेल्या फेरीनंतर सोमवारी (ता. २५) रात्री झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टिका केली. बोलविलेले नेते येणार नसल्याचे राष्ट्रवादीची आजची सभा रद्द करावी लागली. मात्र, आरोप आमच्यावर करतात. त्यांचा रडीचा डाव लहानपणापासून माहित आहे मात्र आपण बोलत नाही. माझ्यावर ते नेहमी टिका आणि आरोप करतात. दारुच्या फॅक्ट्रीबाबबत केलेल्या आरोपानंतर पत्रकारांनी ‘त्यांची पातळी घसरली आहे का,’ असे मला विचारल्यानंतर त्यांची तीच पातळी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. वडिलांच्या नाव घेऊन राजकारण केल्याची टिका करता. मात्र, मी जीवंत असेपर्यंत घेणार, तुमच्यासारखे लोकांचे जोडते उचलत नाही असा आरोप करत मी त्यांचा गड बांधला तुम्ही साधा वडिलांचा चौथरा तरी बांधला का, असा सवालही त्यांनी केला.

प्रितम मुंडेंच्या राजकीय जन्माबाबत विचारणारे धनंजय मुंडे जिल्हा परिषद सोडता कुठली निवडणुक जिंकले असा सवाल करुन दिवंगत मुंडे उपमुख्यमंत्री असतानाही केवळ सव्वाशे मतांनी विजय झाल्याचे त्या म्हणाल्या. ऊसतोड कामगारांचा विषय आपण शरद पवारांसोबत बसून सोडविल्याचा दावाही त्यांनी केला. सुजय विखेंच्या पक्षांतरावर टिका करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादीत जाताना वडिलांना पुढे केले. त्यामुळे पंडितअण्णांना पराभवाचे तोंड बघावे लागले असेही त्या म्हणाल्या. जे वडिलांचे होऊ शकले नाहीत ते समाजाचे काय होणार असा सवालही त्यांनी केला. शरद पवारांनी कष्टाने पक्ष बांधला. मात्र, आता असे पक्षविरोधी नेते राष्ट्रवादीत आल्याचा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT