Pankaja Munde
Pankaja Munde sakal
मराठवाडा

Pankaja Munde : आरक्षणासंदर्भात लोकांच्या मनात अजूनही प्रश्न ; पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा

पाटोदा : मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी डोक्यावर फेटा बांधणार नाही, असा पण केला होता. आता आरक्षण मिळाले असले, तरी लोकांच्या मनात आरक्षणासंदर्भात असंख्य प्रश्न आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवरून मला फेटा बांधायची इच्छा होत नाहीये, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

महासांगवी येथील संत मीराबाई आईसाहेब संस्थान येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार सुरेश धस, आमदार बाळसाहेब आजबे व माजी आमदार भीमराव धोंडे यांची उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘‘आज समाजा-समाजांमध्ये राजकारणाच्या हेतूसाठी भिंती उभारल्या गेल्या आहेत. जातीपातीची मुळं अगदी खोलवर रुजलीय, प्रत्येकाने आपापल्या जातीचे महापुरुषदेखील वाटून घेतले आहेत. जिल्ह्यातील गडांची महती खूप मोठी आहे. मात्र, हे गड राजकारणाचे फड होऊ नयेत, असा निश्चय मी केला आहे.’’ याप्रसंगी संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. दरम्यान, महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तांची मोठी मांदियाळी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT