file photo 
मराठवाडा

पोलिस ठाण्यातच आरोपीने उचलेले ‘हे’ पाऊल...वाचा सविस्तर  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका गुन्ह्यात पकडून आणलेल्या गुन्हेगाराने पोलिस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो आपले डोके आपटून घेत असतांना पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली. ही घटना रविवारी (ता. नऊ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घडली. याबाबत पोलिसांनी मात्र अत्यंत गोपनियता पाळली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्‍ह्यात संशयावरून शेख अमेर शेख पाशा (वय २०) या तरुणाला रविवारी (ता. नऊ) सकाळी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. त्याची कसुन चौकशी करण्यात आली. तो पोलिस चौकशीत असतांना त्याला ज्या खोलीत बसविले होते त्या ठिकाणी असलेल्या एका लाकडी टेबलच्या लोखंडी पायावर त्याने आपले डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या समोर झाल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. 

शेख अमेरविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईवर बोट ठेवत मारहाणीत शेख अमेर याचे डोके फुटल्याचा आरोप केला आहे. उपस्थित पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन लगेच त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. पोलिसांच्या या अघोरी कारवाईबद्दल संताप पसरला आहे. त्याउलट पोलिस हवालदार विष्णु शिंदे यांच्या फिर्यादीवरुन शेख अमेरविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे करत आहेत. मात्र या घटनेमुळे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

सव्वादोन लाखाची घरफोडी 

नांदेड : कुलूपबंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी शुक्रवारी (ता. सात) दहेगाव (ता. माहूर) येथे झाली. 

दादाजी गंगाराम कराळे (वय ४९) हे आपल्या घराला कुलूप लावून परिवारासह शेतात गेले होते. घराला कुलूप पाहिल्याने व आजूबाजूला कोणीच दिसत नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडले. घरात घुसून लोखंडी कपाट फोडून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिणे व नगदी रक्कम असा सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला. दामाजी कराळे हे सायंकाळी आपल्या घरी आल्यानंतर त्यांचे घर उघडे दिसले. त्यांनी घरात जावून पाहिले तर चोरट्यांनी कपाटातील होते नव्हते ते सर्व चोरुन नेल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच माहूर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दादाजी कराळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. तिडके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT