नांदेडमध्ये ‘१०८’ ला अपघात

फोटो
फोटो

नांदेड : एका महिला रुग्णाला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ‘१०८’ रुग्णवाहिकेला वजिराबाद चौकात पहाटे अडीचच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. तात्काळ दुसरी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला वेळेत शासकिय रुग्णालयात पोचविले. 

महानगरपालिच्या शामनगर येथील महिला रुग्णालयातून प्रसितीसाठी एका रुग्णाला विष्णपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका (एमएच१४-सीएल-०८४५) मधून सोमवारी (ता. १०) पहाटे अडीचच्या सुमारास घेऊन जात होती. ही रुग्णवाहिका शहराच्या वजिराबाद चौकात येत असतांना लोह्याकडून शहरात येणाऱ्या क्रुझर ( एमएच२६-एएफ-२०८१) च्या चालकाने आपल्या ताब्यातीव वरील क्रमांकाचे वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून रुग्णवाहिकेला धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला पलटली. या रुग्णवाहिकेत महिला रुग्ण व तिचे काही नातेवाईक होते. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. 

वजिराबाद चौकातील घटना

यानंतर रुग्णवाहिकेतील डॉ. मुंदडा यांनी तातडीने आपली दुसरी रुग्णावाहिका बोलावून घेतली. त्या रुग्णवाहिकेतून प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलेला पाठवून दिले. यानंतर वजिराबाद पोलिस ठाण्याचे हवालदार श्री. संवडकर यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत वजिराबाद चौकात धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून क्रुझर या गाडीला ताब्यात घेऊन वजिराबाद पोलिस ठाण्यात लावली. रात्रीची वेळ असल्याने शहरात बाहेरून येणारी वाहने सुसाट धावत असतात. असाच एक नुकताच प्रकार कॅनाल रोडवर घडला होता. यात एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. शहरात येणाऱ्या वाहनांच्या गतीवर नियंत्रण असणे आवश्‍यक आहे. मग ते वाहन रात्री किंवा शहारत येत असले तर त्याची गती नियंत्रणात येईल तेवढी असायला पाहिजे. 

अपघातात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही

या प्रकरणी या रुग्णवाहिकेचे डॉ. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रुग्णावाहिकेच्या चालकाची कुठलीच चुक नसुन समोरून येणाऱ्या क्रुझर चालकाचा त्याच्या वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. परंतु डॉ. मुंदडा यांनी सतर्कता पाळत दुसरी रुग्णावाहिका बोलावून घेऊन त्या महिला रुग्णाला शासकिय रुग्णालयात दाखल केले. रुग्ण व त्याचे नातेवाईक ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. 
डॉ. कुलकर्णी (जिल्हा समन्वयक १०८, रुग्णवाहिका, नांदेड)  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com