Harsul-Jail
Harsul-Jail 
मराठवाडा

कैदी महिलांचे हात, बनवू लागले लॉक!

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पंधरा महिलांनी महिन्याकाठी तब्बल दोन लाख दुचाकी लॉक असेंब्ली तयार करण्याची किमया साधली आहे. अवघ्या ५०० चौरस फुटांच्या जागेत पंधरा भगिनींच्या तीस हातांनी हे कौशल्य आत्मसात केले आहे. 

पुण्यातील एका नामांकित दुचाकी कंपनीला लागणाऱ्या हॅंडल लॉक असेंब्लीचे भाग तयार करण्याचे काम हर्सूलमध्ये केले जाते. यासाठी औरंगाबादेत एका मोठ्या व्हेंडर कंपनीने गेल्या दोन वर्षांपूर्वी हर्सूल मध्यवर्ती कारागृहाशी करार करीत महिला कैद्यांच्या माध्यमातून लॉक असेंब्ली तयार करण्याचे युनिट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर अंमल करीत सुरू झालेले हे काम आज जोमात आहे. या पंधरा महिला दिवसाला आठ हजार तर महिन्याकाठी दोन लाख लॉक असेंब्ली तयार करण्याचे मोठे काम करतात. सुरवातीला महिला कैद्यांना इंडक्‍शन ट्रेनिंगच्या माध्यमातून लॉक असेंब्ली तयार करण्याचे कौशल्य शिकवण्यात आले. त्यानंतर या महिलांकडून शेडमध्ये प्रत्यक्षात काम घेणे जुलै २०१६ नंतर सुरू झाले होते. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रही देण्यात आले. यामुळे शिक्षेचा काळ संपल्यानंतर त्याच्या आधारावर नोकरी आणि मानाचे आयुष्य जगण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

कामाचा मोबदला ६१ रुपये
करारानुसार महिलांकडून घेतल्या जाणाऱ्या या कामासाठी दोनशे रुपयांची रक्‍कम कारागृह प्रशासनाला देण्यात येते. कारागृहांच्या नियमाप्रमाणे या प्रत्येक महिलेला आठ तासांच्या कामाचा ६१ रुपये मोबदला देण्यात येतो. या कामासाठी लागणारा कच्चा माल आणि पूर्ण झालेल्या लॉक युनिटची गरज पाहण्यासाठी या लॉक कंपनीचे काही कर्मचारीही हर्सूल कारागृहात पूर्णवेळ काम करतात.

‘‘दुचाकींचे लॉक तयार करण्याच्या प्रयोगातून हर्सूल कारागृहात दिवसाला आठ हजार लॉक असेंब्ली तयार करण्यात येत आहेत. ही सुविधा सध्या पाचशे चौरस फुटांमध्ये असून पंधरा महिला त्यात काम करतात.’’  
- ज्ञानेश्वर काळे, तुरुंग अधिकारी, हर्सूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT