crime
crime 
मराठवाडा

अल्पवयीन मेव्हणीसोबत अश्लिल चाळे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : 'तुझे चुलते गावाला गेले असून तुला घ्यायला मला पाठवले आहे' असे सांगून मोटारसायकलवर बसवून बोधन येथील रुमवर अल्पवयीन मेव्हणी सोबत भाऊजीनेच कुकर्म केल्याची घटना घडली असून. पिडीतेच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलिस ठाण्यात या भाऊजीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा नायगाव तालुक्यातील राहेर येथील असून तो सध्या तेलंगणातील बोधन येथे सुतारकीचे काम करतो. पिडीत अल्पवयीन मुलीच्या बहीणीसोबतच याचा विवाह झाला आहे. पण काही दिवसांपूर्वी आरोपीची पत्नी आजारी असल्याने तीला बिलोली तालुक्यातील खपराळा येथे पाठवून दिल आहे.

पिडीत मुलगी ही आरोपीची सख्खी मेव्हणी असून ती नायगाव येथे आपल्या चुलत्याकडे राहते आणि सध्या ती बारावीत शिकत आहे. मात्र पाच जुलै रोजी सकाळी अकरा च्या दरम्यान आरोपी मोटारसायकल घेवून काॅलेज जवळ गेला आणि अल्पवयीन असलेल्या आपल्या मेव्हणीला तुझे चुलते गावाला गेले आसून तुला घ्यायला मला पाठवले आहे असे सांगितले.

भाऊजीच असल्याने मेव्हणी मोटारसायकलवर बसून सोबत निघाली. गावाकडे जायचे म्हणून अगोदर दुगाव पाटी, कुंभरगाव महादेव मंदिर, नंतर तेलंगणातील सारंगपुर आणि सायंकाळी बोधन येथील आपल्या खोलीवर घेवून गेला. गावाकडे न जाता बिलोलीकडे मोटारसायकल घेवून जात असतांना पिडीतेने विरोध केला पण गप्प बस नाही तर तुझ्या बहीणीला संपवून टाकण्याची धमकी दिली. तोंड ओढणीने बांधून कुकर्म केला आणि सहा जुलै रोजी खपराळा येथे सोडून दिल्याची घटना घडली.

चक्क भावजीनेच लहान बहीणीसारख्या असलेल्या अल्पवयीन मेव्हणीसोबत बळजबरी केल्याने पुर्ण कुटुंबच हादरुन गेल होत. मात्र पिडीतेच्या बहीणीने आपल्या संसाराचे काहीही होवो पण कुकर्म करणाऱ्याला शिक्षा मिळाली पाहीजे असे सांगून कुटुंबाला धिर दिला. नऊ जुलैला नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बलात्कारासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT