Parbhani News esakal
मराठवाडा

Parbhani : जिंतूरमध्ये बोर्डीकर-भांबळे समर्थकांमध्ये तुफान राडा, शहरात तणाव

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे या दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : भाजपचे (BJP) जिल्ह्यातील जेष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे या दोन बड्या नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारीची घटना रविवारी (ता.२७) सकाळी घडली. दरम्यान, जिंतूर शहरात तणाव पसरला आहे. दोन्ही कडील जमावास पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रियेसाठी ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर (Ramprasad Bordikar) व माजी आमदार विजय भांबळे (VIjay Bhambale) हे स्वतः उपस्थित होते. यावेळी दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते. (Ramprasad Bordikar And Vijay Bhambale Supporters Beaten Each other In Jintur Of Parbhani)

यावेळी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत का आलात ? म्हणून बोर्डीकर गटाच्या एकावर भांबळे यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी बोर्डीकर व भांबळे यांच्यात वादविवाद सुरू झाला. वाद अधिकच वाढला. दोन्ही नेत्यांचे समर्थकही एकमेकांच्या दिशेने धावून गेले. दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आल्याने मतदान केंद्राच्या परिसरात तणाव पसरला. घटनेची माहिती कळता पोलिसांची अधिक कुमक या ठिकाणी पाठविण्यात आली. (Parbhani)

पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचे आवाहन केले. परंतू वाद अधिकच वाढल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना व अन्य वरिष्ठ अधिकारी जिंतूर (Jintur) शहरात दाखल झाले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT