Honda Activa होणार इलेक्ट्रिक स्कूटर? काय असतील फिचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honda Activa To Be Electric Scooter

Honda Activa होणार इलेक्ट्रिक स्कूटर? काय असतील फिचर्स

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Ola आणि Ather या कंपन्यांबरोबर बजाज आणि टीव्हीएसनेही उडी घेतली आहे. मात्र आता खूप लवकर या सेगमेंटमध्ये स्कूटर मार्केटमधील अग्रगणी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाही (Honda Motorcycle And Scooter India) आपले उत्पादन लाँच करु शकते.

होंडा अॅक्टिव्हा होणार इलेक्ट्रिक स्कूटर ?

भारतात आता स्कूटर सेगमेंटमध्ये आघाडीवर होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) आहे. बाजारात आता तिची सहावी जेनरेशन माॅडल उपलब्ध आहे. आता बातमी आहे, की होंडा खूप लवकर भारतीय बाजारात एक इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच करु शकते आणि ते होंडा अॅक्टिव्हावर आधारित असेल. नुकतेच होंडाचे अध्यक्ष आत्सुशी ओगाता यांनी एका मुलाखतीत कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची टाईमलाईन सांगितली आहोती. कंपनी एप्रिल २०२२ पासून मार्च २०२३ या दरम्यान भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करु शकते. ही स्कूटर होंडा अॅक्टिव्हावर आधारित असण्याची माहिती आहे. मात्र कंपनीने याबाबत काही सांगितलेले नाही. मात्र नुकतेच होंडाची बेन्ली ई स्कूटर भारतात चाचणी दरम्यान दिसली होती.

हेही वाचा: Honda Activa ठरली देशातील सर्वोत्तम स्कूटर, ३० दिवसांत सव्वा लाखांची विक्री

ई स्कूटरमध्ये असू शकते स्वॅपेबल बॅटरी

बातम्यांनुसार होंडा इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये वरचढ ठरण्यासाठी अॅक्टिव्हाच्या ब्रँडचा वापर करु शकते. ही स्कूटर स्वॅपेबल बॅटरी तंत्रज्ञानासह मिळू शकते. बाजारात सध्या Ola S1, Ather 450x, Bajaj Chetak, Okinawa, TVS IQube, Hero Electric यासारख्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड्स उपलब्ध आहेत.

Web Title: Honda Activa May Become Electric Scooter Company Indicates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..