संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

पाण्यातून तो गुंगीचे औषध द्यायचा, मग वारंवार बलात्कार करायचा...बीड जिल्ह्यातील प्रकरण 

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीड) - अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपात एकास दोषी ठरवून येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. पटवारी यांनी जन्मठेप व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सोमवारी (ता. दहा) सुनावण्यात आला. अत्याचाराची घटना परळी तालुक्‍यात घडली होती. 

याबाबत माहिती अशी, की 2012 मध्ये अल्पवयीन मुलगी सुटीनिमित्त गावाकडे गेली होती. त्या वेळी तिच्या नात्यातील भगवान अप्पासाहेब दळवी (तत्कालीन वय 32) हा पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध देत वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने या मुलीला दिली होती. यानंतर पीडितेच्या पोटात त्रास होऊ लागल्याने तिला आजीने येथील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. 

तपासणीदरम्यान डॉक्‍टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विचारणा केली असता तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी भगवान दळवी याच्यावर डिसेंबर 2016 मध्ये सिरसाळा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्‍सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास प्रारंभी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. एल. जाधव यांनी केला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल आनंद यांनी तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 

या प्रकरणी न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तपासल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. पटवारी यांनी भगवान दळवी याला दोषी ठरवत बलात्काराच्या आरोपात जन्मठेप व इतर गुन्ह्यातही विविध शिक्षा सुनावत 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी गोविंद कदम, पोलिस कर्मचारी राहुल शेप व बी.एस.सोडगीर यांनी मदत केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT