कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यांनो, वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

सध्या कोरोना विषाणूमुळे बीड जिल्ह्यातील नागरिक धास्तावले असून, कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आढळला का? याविषयी चर्चा केली जात आहे. मात्र, या प्रकाराने नॉनव्हेज खाणाऱ्यांनी सध्या शाकाहारावरच भर दिला आहे. 

माजलगाव (जि. बीड) - चीनसह काही देशांमध्ये सध्या कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा भारतातही संशयित रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा आजार नेमका कशामुळे होतो, याचा शोध घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

कोरोनामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकही धास्तावले असून चिकन खवय्यांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या चिकन विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणू अत्यंत घातक समजला जातो. त्यावर अद्याप कसल्याही प्रकारची उपाययोजना झालेली नाही. कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे मांसाहार करणाऱ्या लोकांच्या जेवणातील चिकन, मटन, मासे हद्दपार झाले आहेत.

हेही वाचा - कोरोना विषाणू लातूरमध्ये येऊच नये म्हणून....

याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येत असली तरी या भयानक आजारामुळे मांसाहार नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या चिकन मार्केट ठप्प झाले आहे. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

सोशल मीडियावर कोरोना विषाणूच्या लागणीबाबत व्हिडिओ, संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे; परंतु चिकन खाण्यातून विषाणूची लागण होत असल्याची चुकीची माहिती दिली जात असल्याचा डॉक्‍टरांचा दावा आहे.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

माजलगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. अलमवार यांनी सांगितले की, कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्या, या अफवा आहेत. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू असतो, तोसुद्धा आपल्या परिसरात नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is the corona virus in chickens?