तुमचा विवाह कधी झालाय... बघा जमतेय का काही... 

टीम ई सकाळ
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आपले विवाह कोणत्या महिन्यात झाले आहे याचा आपल्या नात्यावर प्रभाव पडत असतो. यासंबंधीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फार लोकप्रिय होत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अनंत पांडव यांच्या मते, हे खाली वर्तवलेले भविष्य अतिशय योग्य आहे.

आपले विवाह कोणत्या महिन्यात झाले आहे याचा आपल्या नात्यावर प्रभाव पडत असतो. यासंबंधीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर फार लोकप्रिय होत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अनंत पांडव यांच्या मते, हे खाली वर्तवलेले भविष्य अतिशय योग्य आहे. यात प्रत्येक जोडप्यात किमान ५० टक्के तरी सत्यता प्रत्येकाला जाणवेल. जाणून घ्या आपल्यातील पतीपत्नीच्या नात्याबद्दल थोडेसे...

22 डिसेंबर ते 19 जानेवारी या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावर मकर राशीचा प्रभाव असतो अर्थात असे जोडपे खूप जबाबदार असतात. परंतु त्यांच्यात रोमान्सची कमतरता असते.

20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान झालेले विवाह कुंभ राशीने प्रभावित असतात. अर्थात असे जोडपे जगावेगळे असतात. हे सकारात्मक विचारधारा असलेले आणि नेहमी आकर्षणाचे केंद्र असतात.

शनीपासून राहा या तीन राशीच्या लोकांनी सावध

19 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान झालेले विवाह मीन राशीने प्रभावित असतात. हे जोडपे इमोशनल असतात. एकमेकांवर खूप प्रेम करतात, परंतु दर्शवत नाहीत. 

21 मार्च ते 19 एप्रिल या काळात झालेले विवाह मेष राशीने प्रभावित असतं, असे जोडपे रोमँटिक आणि स्वभावाने स्पष्ट असतात. दोघांमध्ये प्रेमही असतं आणि मतभेद देखील कारण दोघेही स्वत:ची तुलना करत असतात.

20 एप्रिल ते 20 मे या काळातील विवाह हे वृषभ राशीने प्रभावित असतं, या जोडप्यातून एक प्रभुत्व गाजवणारा, तर दुसरा जुळवून घेणारा असतो म्हणून हे नातं सुरळीत असतं.

साडेसाती काळात काय राहील या तीन राशींचे राशिफल

21 मे ते 20 जून दरम्यान झालेल्या मिथुन राशीने प्रभावित विवाहात प्रत्येक गोष्टीची अती असते, मग ते प्रेम असो वा भांडण. असे जोडपे प्रेम करताना अगदी आकंठ प्रेमात बुडतात आणि भांडतात तेव्हा कितीतरी‍ दिवस एकमेकाचं तोंडदेखील बघायला तयार नसतात.

21 जून ते 22 जुलै या काळातील विवाह कर्क राशीने प्रभावित असतं. ज्यात पती-पत्नी घरामुळे परेशान असतात आणि आयुष्यभर त्याचा वि‍चार करत असतात. दोघं कधी तर प्रेमात बुडून जातात परंतु कामाची जबाबदारी लक्षात येताच यांच्यातील रोमांस हरवून जातो. 

23 जुलै ते 22 ऑगस्ट या दरम्यानचे विवाह सिंह राशीने प्रभावित असतात, या जोडप्यात अहंकार असतो ज्यामुळे भांडण होतात. यांच्यात प्रेम आणि काळजी असते परंतू राग आल्यावर सर्वकाही नाहीसं होतं.

वाचा - असा होमार माहूरगडाचा विकास

23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या काळातले विवाह कन्या राशीने प्रभावित असतात और असे जोडपे खूप संवेदनशील आयुष्य जगतात.

23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या तारखांमध्ये झालेले विवाह तूळ राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात प्रत्येक गोष्ट खूप संतुलित असते. म्हणून यांना पर्फेक्ट कपल म्हणतात.

23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान झालेले विवाह वृश्चिक राशीने प्रभावित असतात. असे जोडपे प्रेमी असतात ज्यामुळे यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. पण याची पूर्ती न झाल्यास वाद निर्माण होतात.

22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर हे विवाह धनू राशीने प्रभावित असतात. हे जोडपे हट्टी असतात तरी एकमेकाला समजून घेतात आणि आपल्या नात्याची काळजी घेतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Is The Month Of Your Marriage Aurangabad News