jalna
jalna 
मराठवाडा

जालना -  नातेवाईकांनी दोन मृतदेहासह नगरपालिकेसमोर ठिय्या मांडला

उमेश वाघमारे

जालना - गणपती बाप्पांचे विसर्जन करता जालना येथे रविवारी ( ता.23) शहरातील तिघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. नगरपालिकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत सोमवारी (ता.24) नातेवाईकांनी दोन मृतदेहासह नगरपालिकेसमोर ठिय्या मांडला होता. 

जालना शहरातील मोती तलाव येथे रविवारी (ता.24) दुपारीपासून बाप्पांचे विसर्जन सुरु झाले होते. दरम्यान, मोती तलावत गणपती विसर्जनासाठी आलेल्या अमोल संतोष रणमुळे (वय 17, लक्ष्मीनारायणनगर), लक्कडकोट भागातील निहाल खुशाल चौधरी (वय 26), शेखर मधुकर भदनेकर (वय 20) यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. या तिघांच्या मृतदेहाचे  सोमवारी (ता.24) शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी निहाल खुशाल चौधरी (वय 26), शेखर मधुकर भदनेकर (वय 20) यांचे मृतदेह घेऊन नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोनल केले. विसर्जन ठिकाणी लाईफ जॉकेट, गोताखोर नव्हते सर्व कारभार अलबेल होता, असा आरोप नातेवाईकांनी केले. 

तसेच मयतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये द्या, कुटुंबातील एकाला नोकरीत समाविष्ट करा अशी मागणी नातेवाईकांनी  नगरपालिकेकडे केली. या मागन्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व पक्षांकडून माडन्यात येथील असे आश्वासन उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी दिले. तर या मागण्यांसंदर्भात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जो निर्यण होईल, ती मदत मयतांच्या कुटुंबाला देण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिले. त्यानंतर नातेवाईक नगरपालिकेच्या दरातून मृतदेह घेऊन गेले. 

दरम्यान या घटनेची चौकशी जिल्ह्याधिकारी यांच्याकडे मागणी करुण वरिष्ठ स्थावरुन चौकशी करुण असे ही मुख्याधिकारी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT