nanded
nanded 
मराठवाडा

नांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस

सकाळवृत्तसेवा

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. यात संभाजी मोहिते यांच्या हाताची नस तुटून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अर्धापूर-वसमत रोडपासून जवळच असलेल्या गणपूर गावात संभाजी मोहिते यांच्या घरात त्यांचे कुटुंबिय झोपलेले होते. आज (ता. 16) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरानी गावापासून थोडे दूर असलेल्या त्या एका घरात प्रवेश केला. तिथे एक वृद्ध दाम्पत्य व लहान बालके होती. दरोडेखोराकडे रॉड, कोयता व चाकू सारखी शस्त्रे होती. या सर्वाना मारहाण करून घरातील कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 1 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यात संभाजी मोहिते यांच्यावर धारधार शस्त्राने मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. 

घरात वयस्क आणि अत्यंत लहान बालकेच होती. अजूनही ते भीतीच्या वातावरणात आहेत. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक घटना स्थळी पोहोचले. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती,  महादेव मांजरमकर सह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकाला पाचारण आले होते. दरोडेखोराना लवकरच जेरबंद करू अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक महादेव मांजरमकर यांनी दिली. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दरोड्यांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT