Sand
Sand 
मराठवाडा

वाळू वाहतुकीला ‘महसुली मार्ग’

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - हर्सूल तलावातील अवैध वाळू उपशाकडे महापालिकेची डोळेझाक होत असतानाच शहरात वाळू वाहतुकीला महसूल विभागातील ‘खवय्यां’कडून सर्रास हिरवा कंदील दाखविला जात आहे. शहारात जागोजागी वाळूचे अवैध साठे असतानाही त्यांच्यावर महसुली बडगा उगारला जात नसल्याचे चित्र आहे. 

तहसीलदारांचा चालक अविनाश जाधव याच्यावर दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी  गुन्हा नोंद झाला. या घटनेने महसूल विभागातील लाचखोरी समोर आली. एका वाहनाला वाट मोकळी करून देण्यासाठी ५० हजार रुपये घेतले जात आहेत. खासकरून हे हप्ते वाळू वाहतूकदारांना जमा करायला लावले जात असल्याचे दीड लाखांच्या लाच प्रकरणातून समोर आले. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात परवानगी नाही; परंतु नियम धाब्यावर बसवून चालक ‘महसुली’ मर्जीवर बिनधास्त बंदीआड संधी साधून शहरात वाळूची वाहतूक करीत आहेत.

वाळूच्या लिलावाअभावी हप्तेखोरीत वाढ
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील बहुतांश वाळूपट्ट्यांच्या लिलावाकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्यातील जवळवास ३० वाळू पट्टे लिलावास पात्र असून काही दिवसांपूर्वी त्यांचा ई-टेंडरिंगद्वारे लिलाव करण्यात आला. यापैकी फक्त सात पट्ट्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. यात चिंचखेडा, बोरगाव कासारी, कोटनांद्रा (ता. सिल्लोड), झोलेगाव (ता. वैजापूर), सोलेगाव, पुरी, पखोरा (ता. गंगापूर) या पट्ट्यांस नियमानुसार लिलाव झाला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने उर्वरित पट्ट्यांचा पुन्हा लिलाव केला; पण त्याकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केले.

‘अर्थ’कारणाचा हिरवा कंदील
अवैध वाळूच्या वाहनांना शहराबाहेरच वाहतूक पोलिसांनी रोखणे गरजेचे आहे; पण काही पोलिसांकडून त्यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला जातो. या वाहनांमुळे अनेक अपघात झाले असूनही, वाहनचालकांना शहरात रेती आणण्यास ‘अर्थ’कारणामुळे प्रशासनातील काहींची साथ मिळत आहे. 

साठेबाजांवर कारवाई नाहीच
एकीकडे हर्सूल तलावाचा ताबा महसूल विभाग महापालिकेकडे मागत आहे आणि उलट दुसरीकडे शहरातील सेंट्रल जकात नाका, आझाद चौक, किराडपुरा, हडको, हर्सूल, बीड बायपाससह शहरातील अनेक भागांत मोकळ्या भूखंडावर अवैध वाळू साठा आहे. रस्त्याच्या कडेला हे साठे असून, सर्वांची नजरही त्यावर जाते; पण प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही.

अवैध खननाबाबत काही बाबी निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई केली जाईल. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT