निवेदन फोटो
निवेदन फोटो 
मराठवाडा

वाळू माफियावर मोक्का लावणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांकडून महसूल अधिकाऱ्यांवर वाढते हल्ले लक्षात घेता त्यांच्या विरोधात ‘मोक्का’तंर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला आहे. देगलूर तहसीलदारांवर मंगळवारी (ता. १९) वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाल्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते. वाळू माफियांसह वाळूसाठा केलेल्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करू, असे त्यांनी या वेळी सांगितले.


जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात तसेच देगलूर व बिलोली तालुक्यात माजंरा नदीपात्रातूनही अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. या बाबत वेळीच कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (ता. १९) देगलूर तालुक्यातील बंद पडलेल्या घाटावरून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती देगलूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी मिळाली. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रात्री अकरा वाजता गेले असता त्यांच्या गाडीवर वाळू माफियांनी हल्ला करून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर हल्लेखोरांना अटक केल्याची माहिती देऊन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, ‘‘अशा वाळू माफियांवर मागील गुन्ह्यांची माहिती घेऊन मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या बाबत प्रशासन गंभीर अाहे.’’
नदीकाठच्या भागातील वा

ळूसाठे जप्त करून आठ दिवसांत त्यांचा लिलाव करण्याच्या सूचना सोमवारी (ता. १८) झालेल्या ‘आरओं’च्या बैठकीत दिल्याचे ते म्हणाले. तसेच
वाळूसाठा केलेल्या शेतकऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी 


गौण खनीज उपसा करण्यासाठी जाणाऱ्या पथकासोबत कायमस्वरूपी पोलिस पथक देऊन देगलूर तहसीलदार अरविंद बोळके यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे बुधवारी (ता. २०) केली. जिल्ह्यातील वाळू घाटांवरून रात्री - बेरात्री अवैध वाळू उपसा होत आहे. या बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्हा होत असल्याने पथकासोबत कायमस्वरूपी पोलिस गार्ड द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ, देगलूर तहसीलदार अरविंद बोळंगे, श्रीमती देवकुळे, जिल्हा सचिव संजय नागमवाड, विभागीय संघटक विजय चव्हाण, ए. एम. मोकणे, श्री मिटकरी, ओमप्रकाश गोंड व यू. पी. पांगारकर यांनी दिले.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

SCROLL FOR NEXT