photo 
मराठवाडा

वाळू वाहतुकीवर बैठे पथकांची नजर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पाच बैठे पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार मधुकर खंडागळे यांनी घेतला आहे. यामध्ये स्वतः तहसीलदार सहभागी होणार आहेत.

तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत आहे. चोरट्या मार्गाने यातून उलाढाल होत असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार मधुकर खंडागळे यांनी पाच बैठे पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सहा तलाठी एका पथकात नियुक्त

या साठी एका मंडळ अधिकाऱ्यासह पाच ते सहा तलाठी एका पथकात नियुक्त करण्यात आले आहेत. बैठे पथक वाळू, दगड, मुरूम, वाळू उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार आहेत. मंडळ अधिकारी मधुकर खंदारे यांच्या पथकात तलाठी पी. डी. इंगोले, एन. डी. कांबळे, पी. एस. पांडे, सय्यद अयूब सय्यद रसूल, वामन राठोड, सय्यद अब्दुल हैदर, एच. एस. गवई यांचा समावेश असून हे पथक सोमवार व शनिवार असे दोन दिवस रात्रं-दिवस गस्त घालणार आहे. 

मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश

दुसऱ्या पथकात मंडळ अधिकारी जी. एस. पारिस्कर, तलाठी आर. एन. इंगोले, पी. एल. महालनकर, ए. के. केंद्रेकर, श्रीमती एस. आर. शिरसाठ, आर. आर. देशमुख यांचा समावेश आहे. हे पथक मंगळवार, रविवारी गस्त घालणार आहे. तिसऱ्या पथकात एच. एस. मुंढे, व्ही. बी. बेले, शेख मोईब शेख तुफैल, श्रीमती अबूज, ए. व्ही. गवई यांचे असून हे पथक बुधवारी गस्त घालणार आहे. 

अहवाल सादर करावा लागणार

तसेच मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष यांच्या नेतृत्वाखाली एम. एस. खंदारे, जी. एस. रणखांब, आर. के. इंगोले, श्रीमती आर. बी. वटाने, एस. आर. चौधरी, व्ही. एम. मस्के यांचे पथक गुरुवारी गस्त घालणार आहे. तर के. एन.पोटे यांच्या नेतृत्वाखाली सी. टी. साबळे, श्री. इंगळे, डी. पी. धरणे, एस. यू. लोंढे, किसन तनपुरे, एम. डी. भालेराव यांचे पथक शुक्रवारी गस्त घाणार आहे. दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयात सादर करावा लागणार आहे. कामात दिरंगाई केल्याचे आढळून आल्यास त्‍या बाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.

वाळू चोरीवर लगाम

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यात होत असलेल्या वाळू चोरीवर लगाम बसणार आहे.
- मधुकर खंडागळे, प्रभारी तहसीलदार

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : आमच्या नोंदी सापडल्या म्हणून आरक्षण मागतोय- मनोज जरांगे

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT