hingoli
hingoli 
मराठवाडा

कष्ट करून शेतीमाल पिकवणारा शेतकरी जगवा 

मंगेश शेवाळकर

हिंगोली : शेतीमध्ये धान्य पिकवणारा शेतकरी जगला पाहिजे यासाठी बाजारात शेतीमाल खरेदी करताना दरामध्ये घासाघीस न करता मिळेल त्या भावात शेतीमाल खरेदी करून शेतकऱ्यांना जगवा असे भावनिक आवाहन पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून शनिवारी (ता. 9) येथे केले.

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित कार्यक्रमास प्राचार्य संजीव भारद्वाज, मुख्याध्यापिका संध्यासिंह तोमर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, दुष्काळी परिस्थितीमध्ये जीवन जगण्यासाठी धडपडत असणारे शेतकरी याचे चित्र समोर उभे केले. याशिवाय कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची होणारी परिस्थिती याचे जिवंत चित्रणही  विद्यार्थ्यांनी मांडले.

यावेळी विद्यार्थ्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत ही व्यक्त केले. शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकरी जगला तरच खाण्यासाठी अन्नधान्य मिळू शकेल. जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवला. मात्र बाजारपेठेत  शेतीमाल विक्रीसाठी आल्या नंतर ग्राहक  शेतीमालाचे दर पाडून मागतात. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात शेतीमाल विक्री करून घरी जावे लागते.

शेतीमाल विकून पैसे मिळाल्यानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल अशी अपेक्षा असते. मात्र बाजारपेठेत होणाऱ्या दराची घासाघीस मुळे फोल ठरते. त्यातून निराश झालेले शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करताना दराची घासाघीस करु नका, मिळेल त्या भावात शेतीमाल खरेदी करून शेतकरी जगवा असे भावनिक आव्हान विद्यार्थ्यांनी यावेळी केले विद्यार्थ्यांच्या या आव्हानामुळे उपस्थित नागरिकांची मने देखील हेलावून गेली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी आलेल्या शेतीमाल व बाजारपेठेत बड्या कंपन्यांकडून विक्रीसाठी आलेल्या शेतीमाल यामध्ये कसा फरक असतो हे दाखवून दिले. सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमामध्ये ग्रामीण शेतकऱ्यांचे जिवंत चित्र पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उभे केले. यावेळी नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT