beed
beed sakal
मराठवाडा

Beed News : बीड महसूल प्रशासनातील दोन तलाठ्यांवर झाली निलंबनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

बीड : महसूल प्रशासनातील दोन तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तलाठी महिलेने अनुदान यादी सदोष तयार केली तर एका तलाठ्याने वाळूबद्दल तक्रार करणाऱ्याला उद्धट उत्तर दिल्याचे कारण आहे. वैशाली गणेश आत्राम व सुरेश नाकाडे अशी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी सेवेतून निलंबित केलेल्या तलाठ्यांची नावे आहेत.

तलाठी वैशाली आत्राम यांनी माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या संतोष तयार करुन अनुदान वाटप केले. एकूण क्षेत्राच्या ५० टक्के अनुदान रक्कम देणे अपेक्षित असताना देखील त्यांनी त्यामध्ये कमी- जास्त क्षेत्र दाखवून काही शेतकऱ्यांना कमी तर काहींना जास्त रक्कम दर्शविली व त्याप्रमाणे अनुदान वाटप झाले. वैशाली आत्राम यांच्या विरुद्ध चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.

यात वैशाली आत्राम यांनी नियमबाह्य यादी तयार केल्याचे समोर आले. तर, माजलगाव तालुक्यातील रिधोरी हद्दीत अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार करणाऱ्या नामदेव गवते या तक्रारदाराला तलाठी सुरेश नाकाडे याने वाळू माफियाच्या डोक्यात दगड घालून खून कर असा सल्ला देत अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT