trelar accident 
मराठवाडा

ट्रेलरचे दोन तुकडे; चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वारंगा फाटा(जि. हिंगोली) : महामार्गावरील खड्डा चुकविताना ट्रेलरचालकाने ब्रेक दाबल्याने वाहन उलटून दोन तुकडे झाले. या वेळी ट्रकमधीलच लोखंडी रूळ अंगावरून गेल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोली - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता. सहा) भाटेगाव (ता. कळमनुरी) जवळ घडली.

या बाबत माहिती अशी की, वर्धा येथून ट्रेलर ( एमएच ०६ - एसी ७२६८) हैदराबादकडे अवजड लोखंडी वस्तूंची वाहतूक करीत होता. हा ट्रेलर भाटेगाव परिसरात आला असता महार्मावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात चालक शे. हमिद शे. आलाद्दिन (वय ३३, रा. आंबेसांगवी, ता. लोहा, जि. नांदेड) यांनी ट्रेलरचे ब्रेक दाबले. त्यामुळे ट्रेलर उलटत सरळ झाला. यामध्ये ट्रेलरचे दोन तुकडे झाले. 

पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव

कॅबिनमध्ये असलेले चालक शे. हमिद शे. आलाद्दिन हे कॅबिनच्या बाहेर पडले. मात्र, त्याच वेळी ट्रॉलीमधील लोखंडी पट्याचे रोलर शे. हमिद शे. आलाद्दिन यांच्या अंगावरून गेले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, शेख बाबर, प्रभाकर भेग यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

जीप- ट्रकच्या अपघातात सात जण जखमी

आखाडा बाळापूर : नांदेड- हिंगोली मार्गावरील कुर्तडी पाटीजवळ (ता. कळमनुरी) तवेरा जीप व ट्रकच्या अपघातात जीपमधील सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. सहा) घडली. या बाबत माहिती अशी की, तवेरा जीप (एमएच ३८- ००८२) नांदेड येथून हिंगोलीकडे येत होती. जीप कुर्तडी पाटीजवळ आली असता हिंगोलीकडे फरशी घेऊन येणाऱ्या ट्रकच्या (जीजे ३६ टी ५१५७) चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे जीप ट्रकला धडकली. यामध्ये जीपमधील सात जण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पालिस ठाण्यात सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती.

हिंगोली-नांदेड महामार्ग बनला खड्डेमय

हिंगाेली - नांदेड महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. मात्र, काही महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. दोन महिन्यांत चार ते पाच वेळा वाहने उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघातांच्या घटना घडूनही महामार्गावरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

NEET Paper Leak Case: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने कुणाचा नंबर? संशयास्पद संवाद सीबीआयच्या हाती

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT