अकराशे एकरांची नोंद असणारी सातबारा पुस्तिका गायब

photo
photo

सेनगाव (जि. हिंगोली): येथील तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात सर्व्हे नंबरच्या सातबारांची एक पुस्तिकाच मागील अनेक महिन्यांपासून उपलब्ध नसून ती गायब झाल्याचा आरोप केला जात आहे. त्या पन्नास सर्व्हे नंबर सातबारात सेनगाव शहर परिसरातील एक हजार ११५ एकर जमिनीचा समावेश आहे.

येथील तहसील कार्यालयात अभिलेख कक्ष आहे. विविध कामकाजासाठी अभिलेख कक्षातून खासरापत्रक, सातबारा, सर्व्हे नंबर सातबारा, फेरफार नकल यासह विविध कागदपत्र मागणी करणाऱ्यांना मिळतात. स्थावर मालमत्तेचे जुने महत्त्वपूर्ण रेकॉर्ड येथे आहे. नेहमीच विविध कागदपत्र काढणाऱ्यांची येथे गर्दी राहते. मागील सत्तर वर्षांत शेतजमिनीच्या नोंदी व रेकॉर्डमध्ये विविध महत्त्वपूर्ण बदल होत गेले.

एक हजार ११५ एक्कर जमिनीचा समावेश 

 १९५४ पर्यंत खासरापत्रक सर्व्हे नंबर, १९६२ पोटहिस्सा मोजणी प्रकार बट्टा एक व दोन. १९८९ एकत्रीकरण होऊन सर्व्हे नंबर सातबारा झाली. त्यानंतर गटाची सातबारा असे विविध बदल झाले. शेतजमिनीचे रेकॉर्ड नोंदीचे दस्तऐवज तहसील प्रशासनाकडे असतात. सेनगाव शहर व परिसरातील ४४६ हेक्टर १७ आर. क्षेत्रफळ त्याची एकूण जमीन एक हजार ११५ एक्कर जमिनीचा समावेश असलेली सर्व्हे नंबरच्या सातबारांची एक पुस्तिकाच अभिलेख कक्षातून मागील काही वर्षांपासून सापडत नाही. सर्व्हे नंबर १५१ ते २०० अनुक्रमांक असलेली ही पुस्तिका गायब झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सर्व्हे नंबरच्या सातबाराची असते आवश्यकता

जमिनीच्या जुन्या नोंदी त्या पुस्तिकेत आहेत. कमी-अधिक जमिनीचे क्षेत्रफळ झाल्यावर दुरुस्ती कामासाठी त्या सर्व्हे नंबरच्या सातबाराची आवश्यकता शेतकऱ्यांना भासते. मात्र, अभिलेख कक्षात संबंधित सर्व्हे नंबरच्या सातबाराची छायांकित प्रत मागितली असता ते रेकॉर्ड उपलब्ध नाही. ते कधीपासून नाही या बाबत माहितीही दिली जात नाही. दरम्यान, स्थावर मालमत्तेचे जुने रेकॉर्ड हे महत्त्वपूर्ण असतात. ते एकदा गहाळ किंवा नष्ट झाल्यास पुन्हा तयार करणे हे अशक्य राहते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीचा समावेश असलेली सदरील सर्व्हे नंबरची पुस्तिका गायब होतेच कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

लेखी स्वरूपात लाभार्थींना दिले जाते

येथील तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील जुने रेकॉर्ड, खासरापत्रक, सातबारा, फेरफार, नक्कल यासह विविध रेकॉर्डची स्कॅनिंग प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. संबंधित रेकॉर्ड अद्यावत झाल्यानंतर अभिलेख कक्षाऐवजी ते ऑनलाइन शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. १५१ ते २०० या सर्व्हे नंबरच्या सातबारांचे रेकॉर्ड उपलब्ध नसून तसे लेखी स्वरूपात संबंधित विभागाकडून लाभार्थींना दिले जाते.
-जीवककुमार कांबळे, तहसीलदार

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com