UPSC sakal
मराठवाडा

उजनी : दृष्टीहिनतेचे आव्हान पेलवत पुजाची गगनभरारी

टाक्याची कन्या युपीएससी परीक्षेत 577 रँकने उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा

उजनी ः भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2020 चा निकाल शुक्रवारी(ता.24) जाहिर केला. यामध्ये टाका (ता. औसा) येथिल एका मुलीने दृष्टिहीनतेच्या आव्हानावर मात करून देशातून 577 वा रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. या अविस्मरणीय यशाबद्दल तिच्यावर सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

टाका (ता. औसा) येथिल निवृत्त शिक्षक आशोक कदम यांची मुलगी पूजा कदम हीने भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावातून प्रशासकीय सेवेत रुजू होणारी पाहिलीच व्यक्ती होण्याचा मान मिळविला आहे. विशेषत: तीला फक्त 25 टक्के दृष्टी असताना त्यावर मात करत न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यामुळे तिसऱ्या प्रयत्नात हे यश तिने मिळविल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

येथील अशोक कदम आणि संध्याताई कदम या दाम्पत्याला एकूण चार मुली. सर्वात मोठी जयश्री ही एम .एस .असून दुसरी मुलगी पल्लवी ही एम.टेक .आहे तर तिसरी मुलगी पूनम एम.बी.बी.एस .एमडी आहे. आणि चौथी पूजा. पूजाचे प्राथमिक शिक्षण लातूर येथील शिवाजी शाळेमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण श्री केशवराज विद्यालय मध्ये झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण दयानंद महाविद्यालयात आणि बी.ए.चे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने एम. ए. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली येथून पूर्ण केले. त्याच वेळी पुणे येथे तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तत्पूर्वी पुजा दोन वेळेस मेन्स आणि पाच वेळा प्रिलीम उत्तीर्ण झाली होती. अखेर तिसऱ्या प्रयत्नात पुजाने ह्या दैदीप्यमान यशाला गवसणी घातलीच!

कदम दाम्पत्यांनी उभारला नवा आदर्श

कदम दाम्पत्यांनी चारही मुली असताना त्यांना मुला प्रमाणे शिक्षण देऊन उच्चशिक्षीत केले. या माध्यमातून कदम दाम्पत्यांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबद्दल अजूनही उदासीनता असल्याचे पाहायला मिळते. या मुलींना स्वतःच्या पायावर उभे करत इतर सावित्रीच्या लेकी पुढे त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केल्याची चर्चा पंचक्रोशीत होत असून कौतुक केले जात आहे.

"माझ्या या यशाचे श्रेय मी माझे आई- वडील, भाऊ यांना देते. या यशाच्या माध्यमातून माझ्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टासाठी मला कृतज्ञता व्यक्त करण्याचे संधी मिळाली.योग्य मार्गदर्शन, जिद्द आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणतेही यश संपादन करण्यात येते."

- पुजा अशोक कदम, यूपीएससी रँकर , टाका ता. औसा

"माझ्या चारही मुलींनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. विशेषतः पूजाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या दैदीप्यमान यशामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. मुलींना कमी लेखू नये. कोणत्याही प्रकारचे यश खेचून आणण्याची मुलींमध्ये क्षमता आहे."

- अशोक कदम, पूजाचे वडील

"लहानपणापासून पुजाला वाचनाची खुप आवड होती. तीने घेतलेल्या कठीण परिश्रमामुळे, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे तिला हे यश मिळाले आहे. यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे."

- संध्याताई कदम, पुजाची आई

उजनी ग्रामस्थांकडून पहिला सत्कार

यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्यानंतर पूजा पुन्ह्याहून टाका (ता.औसा) या मूळ गावी परतत असताना उजनी (ता. औसा) येथे ग्रामस्थांच्यावतीने लातूर जील्हयातील पहिला सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुभाष ढवण, आशिवचे सरपंच गोविंद मदने, उपसरपंच रमेश वळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. देवणीकर, गौतम दरेकर, प्रदीप रणखांब, सिद्धाप्पा गंगणे, विकास पाटील, राजेंद्र पाटील आदि नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Auto Rickshaw Driver Killed : गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव! गिरगाव डोंगरात रिक्षा चालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

Pune News: बारामतीत माणुसकीचे दर्शन! रस्त्यात अपघात पाहताच सुनेत्रा पवार थांबल्या; जखमी तरुणीला तत्काळ रुग्णालयात केलं दाखल

SCROLL FOR NEXT