Modi in UN : भारताची प्रगती होते तेव्हा जगाचाही विकास होतो - मोदी

पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलं संबोधन
Modi in UN
Modi in UN

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतानं केलेल्या प्रगतीची जगाला माहिती दिली. जगाच्या प्रगतीमध्ये भारताच्या प्रगतीचा महत्वाचा वाटा आहे हे सांगाताना "भारताची प्रगती होते तेव्हा जगाचाही विकास होतो", असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला.

मोदी म्हणाले, आज जगातील सहा व्यक्ती हा भारतीय आहे. त्यामुळे जेव्हा भारतीयांची प्रगती होते तेव्हा जगाच्या प्रगतीला गती मिळते. त्याचबरोबर भारतात जेव्हा सुधारणा होतात तेव्हा जगात बदल होतो. भारतात लोक जगाची मोठी मदत करु शकतात. आमच्या कर रचना अतुलनीय आहे. युपीआयच्या माध्यमातून भारतात दररोज ३५० कोटींहून अधिक व्यवहार होत आहेत. भारताचा व्हॅक्सिन डिलिव्हरी प्रोग्रॅम कोविन एकाच दिवसात कोरोडो डोस देण्यासाठी डिजिटल सपोर्ट देत आहे.

Modi in UN
Modi in UN: अफगाणिस्तानच्या भुमीचा वापर दहशतवादासाठी व्हायला नको

'सेवा परमो धर्म' जगणारा भारत मर्यादित स्त्रोत उपलब्ध असतानाही लस निर्मितीत जीवतोडून काम करत आहे. मी UNGAला ही माहिती देऊ इच्छितो भारतानं जगातील पहिली डीएनए व्हॅक्सिन विकसित केली आहे. जी लस बारा वर्षांपेक्षा वरच्या सर्व लोकांना दिली जाऊ शकते. त्याचबरोबर आणखी एक एमआरएनए लस विकसित होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. भारताचे वैज्ञानिक नोझल लस बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. जगाप्रती आपली जबाबदारी लक्षात घेत भारतानं पुन्हा एकदा जगातील गरजवंतांना लस द्यायला सुरुवात केली आहे. मी आज जगभरातील लस निर्मिती कंपन्यांना आवाहन करतो की त्यांनी भारतात यावं आणि भारतात लस निर्मिती करावी, अशी माहितीही यावेळी पंतप्रधानांनी आमसभेत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com