sakal
sakal
मराठवाडा

Latur Loksabha Constituency : बरे झाले तुम्ही निसटलात! ; अमित देशमुखांच्या गुगलीवर विक्रम काळे यांचे स्मित हास्य

सकाळ वृत्तसेवा

लातूर : ‘बरे झाले तुम्ही निवडणुकीतून निसटलात’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख यांनी टाकलेल्या गुगलीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळेंनी स्मित हास्य करीत उत्स्फूर्तपणे दाद दिली. निमित्त होते रमजान ईदनिमित्त इदगाह मैदानावर आलेल्या मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देण्याचे.

लोकसभेचा धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. ठाकरे गटाने विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरुद्ध कोणाला उमदेवारी द्यायची, असा महायुतीत पेच होता. ही जागा कोणाला सोडायची यावरही बरेच दिवस खल झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोडवून घेण्यात यश आले. जागा घेतली, पण उमेदवारी कोणाला द्यायची, यावरही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे नाव चर्चेत होते.

दरम्यान, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाने त्यांना लगेचच धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या घटनाक्रमानंतर काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख व आमदार विक्रम काळे यांची पहिल्यांदाच भेट झाली. रमजान ईदनिमित्त इदगाह मैदानावर मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार देशमुख व आमदार काळे हेही आले होते. आमदार काळे खुर्चीवर बसताच ‘बरे झाले तुम्ही निवडणुकीतून निसटलात’, अशी गुगली आमदार देशमुख यांनी टाकली. यावर काळे यांनी स्मित हास्य करीत तेवढीच दाद दिली. दोघांनी थोडावेळ राजकारणावर चर्चा केली. धाराशिवमध्ये वातावरण कसे आहे, याची विचारणाही देशमुखांनी काळेंकडे केली. चर्चेत आमदार धीरज देशमुख यांनीही सहभाग घेतला.

खैरे-इम्तियाज यांची गळाभेट

वक्फ बोर्डाच्यावतीने मंडप उभारण्यात आला होता. शुभेच्छा देण्यासाठी शहरातील मान्यवर या मंडपात उपस्थित होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे काही वर्षांनंतर ईदगाह छावणीत नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी खैरे यांनी कट्टर विरोधी पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

शृंगारे-डॉ. काळगेंची गळाभेट

मुस्लिमबांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार अमित देशमुख यांच्यासोबत काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हेही इदगाह मैदानावर आले होते. यावेळी भाजपचे उमेदवार, विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हेही उपस्थित होते. शृंगारे व काळगे यांनी हस्तांदोलन तर केलेच, पण एकमेकांची गळाभेटही घेतली. त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या खऱ्या, पण त्या ईदच्या होत्या की निवडणुकीतील विजयासाठी होत्या, याची मात्र उपस्थितांत चर्चा रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT