मुक्तपीठ

टक्‍क्‍यांचा सिद्धांत (मुक्तपीठ)

प्रा. डॉ. अपर्णा महाजन

विचार न करणारे, विचार केल्यासारखे भासणारे आणि प्रत्यक्ष विचारसहित कृती करणारे असे तीन प्रकारचे लोक दिसतात.

मला जाणवले की, जगात नव्वद टक्के लोक विचार करत नाहीत, नऊ टक्के लोकांना वाटते की, आपण विचार करतो. पण प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की ते नव्वद टक्‍क्‍यांसारखेच म्हणजे विचार न करणाऱ्यांसारखेच वागतात. मात्र एक टक्काच लोक विचार करतात आणि तशी कृतीही करतात. प्रत्येक क्षेत्रात, प्रसंगात, प्रत्येक ठिकाणी हा नव्वद-नऊ-एक टक्का हा सिद्धांत दिसतो, असे तुमच्याही लक्षात येईल. 

चार चौघांच्या भीतीने, चालीरीतींच्या, इभ्रतीच्या, जगरहाटीच्या, नातेवाइकांच्या भीतीने आपण आपले, खरे आवडणारे आयुष्य वाया घालवतो. ज्या समाजाचे भय मनाशी बाळगून आपण निर्णय घेतो, तो समाज कोण? ज्यांना तुमच्या भावनाशी घेणे-देणे नसते. ज्यांना फक्त शब्द फेकायचे असतात. थोडक्‍यात, स्वातंत्र्याचीच भीती असणाऱ्या नव्वद टक्के लोकांना आपल्याला पाहिजे तसे वागता येत नाही. मग ते लग्न असो किंवा इतर सामाजिक, धार्मिक चालीरीती असोत. हे करताना, खरे आयुष्य जगायचे राहूनच जाते. हे बरोबर आहे म्हणणारे नऊ टक्के लोक प्रत्यक्ष कृती करण्याच्या वेळी नव्वद टक्‍क्‍यांच्या प्रवाहात मिसळून जातात. जन्मक्षण, वाढदिवसाचा प्रसंग या इतकाच वियोगाचा दिवसही गंभीरपणे विचार करण्याचा आहे. त्या दिवशी त्या व्यक्तीच्या स्मृतींनीच शेवट करायच्या ऐवजी मनाला न पटणारे अंत्यविधी करणे हे त्या व्यक्तीची आणि जिवंत वारसाची विटंबनाच नव्हे काय? आणि जर का, माझे अंत्यसंस्कार करायचे नाहीत, माझे देहदान करायचे आहे असे सांगणारी व्यक्ती निर्भयपणे मृत्यूला सामोरी जाणारी वेगळी, म्हणूनच एक टक्‍क्‍यांपैकी असते! पण डोळ्यावर कातडे ओढून, अविवेकाची गोळी घेऊन भ्याडपणे, असहाय्यपणे नव्वद टक्के लोक निर्णय घेत असतात. अशा घाबरून कृती करण्याला जगरहाटी म्हणतात. असेच मेंढ्यांच्या  कळपातही असते. मेंढ्यांच्या कळपाच्या पुढेसुद्धा एकेकच शेळी असते. ती हुशार, विचार करणारी. तिच्या मागे मेंढरे जातात, पुढच्या पायांकडे पाहात. म्हणजे इथेही आहेच की टक्‍क्‍यांचा सिद्धांत!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT