मुंबई

धक्कादायक! तब्बल 60 कामगार कोंबून ट्रक निघाला होता उत्तर प्रदेशात...

सकाळ न्यूज नेटवर्क

भिवंडी : लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी प्रवासी वाहतूक बंद असताना भिवंडी शहरातील 60 कामगारांना ट्रकमधून उत्तर प्रदेश येथे घेऊन जाताना भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण कर्पे यांनी कारीवली गाव परिसरात ट्रक ताब्यात घेत ट्रकमालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

मुंबई शिवाजीनगर गोवंडी येथील ट्रकमालक मोहम्मद अल्ताफ अकबर अली सय्यद याने आपल्या ट्रकचा चालक इरफान अहमद नसीम अहमद फारुकी याच्या मदतीने करीवली ग्रामपंचायत हद्दीतील नालापार येथे ट्रकमध्ये 60 जणांना दाटीवाटीने बसून घेऊन जाण्याच्या तयारीत असताना याची माहिती भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याणराव कर्पे यांना समजताच त्यांनी तत्काळ पोलिस पथक त्या ठिकाणी रवाना करून घटनास्थळावरून ट्रक ताब्यात घेत ट्रकमालक मोहम्मद अल्ताफ अकबर अली सय्यद व चालक इरफान अहमद नसीम अहमद फारुकी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

60 workers leaving truck in Uttar Pradesh

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT