Mumbai Airport
Mumbai Airport sakal
मुंबई

Mumbai Airport : ८० वर्षीय प्रवाशाचा व्हिलचेअर न मिळाल्याने मृत्यू; मुंबई विमानतळावरील घटना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ८० वर्षीय प्रवाशांचा इमिग्रेशन काऊंटरजवळ मृत्यू झाला. या प्रवाशाने पत्नीसोबत न्यूयॉर्क येथून एअर इंडियाच्या विमानात व्हिलचेअर पॅसेंजरच्या रूपात बुकिंग केली होती. परंतु त्यांना व्हिलचेअर मिळाली नाही. चालत गेल्यामुळे मृत्यू झाला. १२ फेब्रुवारीला विमानतळावर न्यूयॉर्कहून एअर इंडियाच्या विमानातून उतरल्यानंतर ही घटना घडली.

मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते. त्यांनी व्हिलचेअरची सुविधा आधीपासून बुक केली होती. या जोडप्याने मुंबईत येण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-११६च्या इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. हे विमान रविवारी न्यूयॉर्कमधून रवाना झाले होते.

या विमानामध्ये ३२ व्हिलचेअर प्रवासी होते. मात्र विमानतळावर केवळ १५ व्हिलचेअर उपलब्ध होत्या. व्हीलचेअर पुरविण्याची जबाबदारी संबंधित एअरलाईन्सची असते. विमानतळ प्राधिकरणाची नाही.

व्हिलचेअरचा तुटवडा असल्याने या जोडप्यासाठी केवळ व्हिलचेअर असिस्टंट तिथे आला. पत्नी त्या व्हिलचेअरवर बसली. तर हे ८० वर्षीय गृहस्थ त्यांच्यामागून चालू लागले. इमिग्रेशन एरियापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सुमारे दीड किमी पायी चालले असतील. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यांना विमानतळावरील वैद्यकीय कक्षात नेले. तिथून त्यांना नानावती रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हिलचेअरच्या अधिक मागणीमुळे प्रवाशाला व्हिलचेअर असिस्टंट मिळेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी पत्नीसोबत चालण्याचा पर्याय निवडला.

सहार पोलीस स्टेशनने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. वरिष्ठ पीआय धनंजय सोनवणे यांनी सांगितले की, "मृत व्यक्तीचे नाव मनुभाई पटेल असे असून हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT