Suicide Sakal media
मुंबई

नालासोपाऱ्यात पित्याने मुलासह मारली ट्रेनसमोर उडी; 3 वर्षांच्या बालकाचा मृत्यू

विजय गायकवाड

नालासोपारा : नालासोपारा (Nalasopara) आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान (Vasai railway Station) एका पित्याने आपल्या तीन वर्षांच्या चिमुरडयासह लोकल ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt) केला आहे. रविवारी सकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. यात पिता गंभीर जखमा झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर तीन वर्षांच्या चिमुरड्याचा (children death) यात मृत्यू झालाय. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

राजीव वाघेला असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पित्याचे नाव असून, कृष्णा वाघेला असे मयत झालेल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याचे नाव आहे. दोघे नालासोपारा पूर्वेकडे राहणारे आहेत. राजीव वाघेला याने मुलासह रविवारी सकाळी विरार- चर्चगेट लोकलसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला.

यात दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला तर राजीव वाघेला याची स्थिती चिंताजनक आहे. त्याला नालासोपारातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. राजीव वाघेलानं हे टोकाचं पाऊल का उचलले याबाबत पोलिसांकडून माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र कौटुंबिक कारणामुळे त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : अंधेरी परिसरातील अनेक रस्ते जलमय, प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्यावरून चालण्यास मनाई

"मला पंडितांकडे जायचंय" ज्योती चांदेकरांची ती इच्छा ऐकताच जुई निशब्द झाली; "तिला स्मशानात असं शांत झोपलेलं..."

Solapur Crime: 'सोलापुरातील आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण'; तरुणाच्या भावजीचा फोननंबर घेऊन पोलिसांनी काढले लोकेशन अन्..

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Pune Crime : 11 वर्षांच्या मुलीचे कपडे बदलताना फोटो काढले, ब्लॅकमेल करत ५ वर्षे अत्याचार; ४४ वर्षीय नराधमाला बेड्या

SCROLL FOR NEXT