Sanjay-Raut-Aaditya-Thackeray
Sanjay-Raut-Aaditya-Thackeray 
मुंबई

आदित्य ठाकरेंनी डिलीट केलेल्या ट्विटवर संजय राऊत म्हणतात...

विराज भागवत

कोरोना लस मोफत देण्याचं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं डिलीट

मुंबई: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी एक ट्वीट केलं. 'महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ पर्याय म्हणून नव्हे तर राज्य सरकारचं कर्तव्य म्हणून घेण्यात आला आहे. नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे', असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. पण काही काळाने ते ट्वीट डिलीट करण्यात आलं. लोकांमध्ये लसीकरण मोहिमेबद्दल शंका उत्पन्न होऊ नये म्हणून हे ट्वीट डिलीट केल्याचं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावर आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

"आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट केलं, त्या मुद्द्यावर मी बोलणार नाही. हा सरकारचा विषय आहे. सरकार या बद्दलचा योग्य तो निर्णय घेईल. जर विरोधकांकडून या बद्दल काही सूचना करण्यात आल्या असतील तर त्यावरही नक्कीच विचार केला जाईल. मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात अनेक निर्णय घेतले आहेत. आदित्य ठाकरे हेदेखील कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय हे कायम राजकारण बाजूला ठेवूनच घेतले जातात. ठाकरे सरकारला संकटाचा संधी म्हणून वापर करून त्याचं राजकारण करण्याची गरज नाही. हे सरकार प्रत्येक पाऊल नागरिकांचा जीव वाचावा म्हणून टाकत आहे. त्यामुळे लसीकरणाचा जो निर्णय होईल त्याबद्दल सरकारमधील प्रमुख मंत्री स्वत: निर्णय जाहीर करतील", अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंबद्दलच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

"सध्या सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे रूग्णदुपटीचा वेग कमी होतोय. त्यामुळे विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. ऑक्सिजन प्लांटबद्दल महाराष्ट्राबद्दल आरोप केला जात असेल तर ते आरोप चुकीचे आहेत. आपल्या राज्यात इतर राज्यांपेक्षा सुरळीत पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. विरोधकांनी राज्य सरकारवर घाणेरडे आरोप करू नयेत. त्यापेक्षा त्यांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे साथ द्यावी. चांगल्या सूचना द्याव्यात. असं झाल्यास कोरोनाचं संकट लवकर दूर होईल", अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT