yogesh soman 
मुंबई

योगेश सोमण यांना क्लीन चिट; विद्यार्थ्यांनी दिला मात्र उपोषणाचा इशारा

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक योगेश सोमण यांच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने सोमण यांना क्लीन चिट दिली आहे. यामुळे सोमण पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाले असून त्यांनी आपल्या विभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. सोमण यांना समितीने निर्दोष ठरविल्याने याविरोधात ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. 

सोमण यांना पदावरून न हटविल्यास कोरोनाच्या काळातच विद्यापीठात उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा विद्यार्थांनी दिला आहे. सोमण यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. या आरोपासह विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे कळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. 

याप्रकरणी संचालकांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. विद्यार्थी आक्रमक झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल शिक्षक-विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नसतानासुद्धा सोमण 7 जुलै रोजीच्या विभागप्रमुखांच्या मिटिंगमध्ये हजर झाल्याने सर्वांच्या भुवया उडाल्या. विद्यापीठ प्रशासनाने कोरोनाच्या आड राहून कुणालाही माहीत न होऊ न देता त्यांना परत घेतले आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने पारदर्शी राहून उत्तर द्यायला हवे. त्यांच्या उपस्थितीचे कारण व चौकशी समितीचा निर्णय कृपया ताबडतोब जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थांनी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. विद्यार्थांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला विद्यापीठ आवारात नाईलाजाने उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा अपूर्व इंगळे यांनी दिला आहे.

सोमण हे रजेवर गेले होते. ते पुन्हा विभागाच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने त्यांना निर्दोष ठरवले आहे. त्याप्रमाणे विद्यापीठाची कार्यवाही सुरू आहे.
- डॉ. विनोद पाटील, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

Mahayuti Politics: महायुतीचा मास्टरस्ट्रोक! बंडखोरांना मोठी ऑफर; भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं कोणतं आमिष दाखवलं?

SCROLL FOR NEXT