Aditya Thackeray
Aditya Thackeray 
मुंबई

आदित्य ठाकरेंची जनाशीर्वाद यात्रा 18 जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 18 जुलै पासून राज्यव्यापी जनाशीर्वाद यात्रा काढणार. सुमारे 4000 किमी चा यात्रा होणार. ज्या मतदारांना लोकसभेत मते दिली त्यांचे आभार व ज्यांनी दिली नाहीत त्यांचे मन वळवण्यासाठी या यात्रेत प्रयत्न होणार. 

येत्या 18 जुलैला जळगाव येथून जनाशिर्वाद यात्रा सुरू होईल. त्यानंतर तारखेला धुळे मालेगाव, 20 जुलैला नाशिक शहर, 21 जुलैला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात तर 22 जुलैला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डीत या जनआशिर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी दिली.

जिथे जिथे यात्रा पोहोचेल तेथील शिवसेना नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहतील. या दरम्यान आदित्य संवाद हा कार्यक्रम,  कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदित्य ठाकरे पोहोचतील. 22 जुलैला पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढील टप्प्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचेही वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT