मुंबई

खासगी बस वाहतुकदारांसाठी खुशखबर, 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या अनेक सेवा आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत सुरू केल्या जात आहे. यापूर्वी खासगी वाहतुकदारांना एसटी प्रमाणेच 50 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती. त्यानंतर आता, एसटी प्रमाणेच राज्यातील खासगी वाहतुकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासाची परवानगी देण्यात आली असून, प्रवासी वाहतुकीदरम्यान कोविड 19 च्या नियमांचे तंतोतंत पालन सुद्धा करावे लागणार आहे.

राज्य सरकारने एसटीला 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर खासगी वाहतुकदारांनी ही 100 टक्के प्रवासी वाहतूक करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आता खासगी वाहतुकीलाही 100 टक्के प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.

दरम्यान खासगी वाहतुकदारांना कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. यामध्ये बसच्या प्रत्येक फेरीअंती बसची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक. मास्क घातला नसेल तर प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवणे आवश्यक. बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी अतिरिक्त मास्क ठेवावे लागणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

after public transport private transporters are allowed to take hundred percent travelers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT