electricity bill esakal
मुंबई

Ambernath News: अंबरनाथच्या काही भागात वीजपुरवठा खंडीत  

Chinmay Jagtap

कल्याण-बदलापूर राज्य मार्गाजवळ महात्मा गांधी विद्यालयाचे प्रांगण तसेच संरक्षण भिंतीलगत रस्त्याच्या बाजूला साधारणतः ३५-४० वर्षे जुनी २५ मीटर उंच मनोऱ्यावर डमी अति उच्चदाब वाहिनी आहे. या वाहिनीतून कसल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा होत नाही. हे मनोरे व वाहिनी ही फार जुनी असल्याने धोकादायक बनली आहे.

तसेच मध्य रेल्वेची ठाकुर्ली ते लोणावळा ही अति उच्चदाब वाहिनी या वाहिनीखालून जाते. त्यामुळे शुक्रवारी (ता. २४) ही वाहिनी हटवण्यात येणार आहे. यामुळे काही कालावधीसाठी अंबरनाथ व उल्हासनगरच्या काही भागाचा वीजपुरवठा बाधित होणार आहे.

वाहिनी हटवण्याच्या कामाकरिता महावितरण तसेच मध्य रेल्वेच्या अतिसंवेदनशील भागाचा विद्युत पुरवठा कमीत कमी कालावधीकरिता बंद करून काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा दुपारी १२ ते ४ दरम्यान बाधित होणार आहे

. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, डिफेन्स कॉलनी, कमलाकर नगर, वांद्रापाडा, नेताजी मार्केट, चिंचपाडा, गांवदेवी, अंबरनाथ केमिकल झोन अंबरनाथ (प), साई सेक्शन, शिव मंदिर रोड, कानसई सेक्शन, भिमनगर, शिवाजी चौक, हुतात्मा चौक, फुले नगर, जावसई, फॉरेस्ट नाका, वडळगाव एम. आय. डी. सी. विभाग, सुभाष टेकडी, लालचक्की मराठा सेक्शन, उल्हासनगर स्टेशन परिसर, ओ.टी. सेक्शन, अंबरनाथ (पूर्व), चिंचपाडा, वंदना थिएटर, एम.जे.पी. पाणीपुरवठा, अंबरनाथ स्टेशन रोड, भाजी मार्केट, मातोश्री नगर, जुने म्युनिसिपल कौन्सिल आणि १ नं. एच. टी. ग्राहक, स्वामीनगर, आय. टी. आय., उल्हासनगर ४ व इतर २२/२२ केव्ही अंबरनाथ स्विचिंग स्टेशन येथून पुरवठा होणारा विभाग, उल्हासनगर विभाग २ व ३ मधील काही भागांचा यात समावेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT