knife-attack
knife-attack sakal
मुंबई

Crime News : कौटुंबिक वादातून जावयाकडून सासऱ्याच्या हत्येचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

कौटुंबिक वादामुळे जावयाने आपल्या सासऱ्याची हत्या करण्याच्या गुन्ह्याची नोंद सांताक्रुझ येथे नोंदली आहे.

मुंबई - कौटुंबिक वादामुळे जावयाने आपल्या सासऱ्याची हत्या करण्याच्या गुन्ह्याची नोंद सांताक्रुझ येथे नोंदली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी आरोपी जावयाला कोलकात्याहून अटक केली आहे. आरोपीला फोन कॉलवर सासऱ्याने आपल्या आईला शिवीगाळ केल्याचे ऐकून त्याने आपल्या सासऱ्यावर आणि भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याने आपल्याच 7 वर्षाच्या मुलालाही चाकूने वार केले. आरोपीच्या मेहुण्याने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला कोलकाता येथे पकडले आणि रविवार 20 नोव्हेंबरला मुंबईत आणले. 35 वर्षीय अदनान सेलोत असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मागील आठवड्यात 18 नोव्हेंबर रोजी विलेपार्ले पश्चिमेतील साखरवाला चाळ येथे ही घटना घडली होती. रागाच्या भरात आरोपी अदनान सेलोत याने चाकूने हल्ला करून त्याचा 25 वर्षीय मेहुणा आदिल शर्मावर हल्ला केला.

आदीलच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीच्या सासऱ्यांने हस्तक्षेप करून मुलगा आदिलला वाचवण्याचा प्रयत्न केला असता सासरा नूर मोहम्मद यांच्यावरही त्याने हल्ला केला. चौकशीदरम्यान अदनानचे आदिलची आई आणि बहिण कुटुंब असल्याचे समोर आले आहे. अदनानने आपल्या मावशीच्या मुलीशी लग्न केले आणि लग्नानंतर ते दोघे नालासोपारा येथे राहत होते. अदनान हा बोरिवली मार्केटमध्ये कामाला होता. लग्नानंतर पत्नीला सोबत न ठेवता विलेपार्ले येथील तिच्या माहेरी घरी पाठवले. कित्येक महिने त्यांची भेट अदनानने घेतली नाही. अखेरीस मेहुणा आदिलने अदनानला फोन करून घटनेच्या एक दिवस आधी पत्नी आणि मुलांना घेऊन जाण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या अदनानने आदिल व सासरच्या मंडळींना तसेच त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली.

आदिलने नंतर अदनानच्या आईला फोन करून त्याच दिवशी फोनवर शिवीगाळ केली. जेव्हा अदनानला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने चाकू घेऊन सासरच्या घरी जाऊन आदिल आणि त्याचा सासरा नूर मोहम्मद यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या भांडणात मध्यस्थी केल्यावर अदनानने सासरा नूर मोहम्मद यांच्यावर हल्ला केला. त्याचा 7 वर्षांचा मुलगा साबीर याला दुखापत केल्यानंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपीला कोलकाता मधून अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT