best bus 
मुंबई

मृत कामगारांच्या कुटुंबांना बेस्ट उपक्रमाचा दिलासा; वारसांना सेवेत सामावून घेणार...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होऊन दगालेल्या कामगारांच्या वारसांना बेस्ट उपक्रमात नोकरी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या कामगारांच्या कुटुंबांना बेस्ट उपक्रम आधार देणार आहे.

लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी बेस्ट उपक्रमातील अनेक कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत बेस्टमधील 95 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी चार कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय  बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी घेतला आहे. अन्य दोन दिवंगत कामगारांच्या कुटुंबांतील सदस्यांनाही नोकरी दिली जाणार आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमातील ६० टक्के कामगार, कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. इमारती, वसाहती सील झाल्याने अनेक कामगार अडकून पडले आहेत. त्यांची गैरसोय समजून घेतली जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे . 

पगार कपातीमुळे नाराजी
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. आरोग्य, सुरक्षा, आपत्कालीन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या परिवहन विभागामुळे दररोज कार्यालयात पोहोचणे शक्य होते. परंतु, जिवाचा धोका पत्करून कामावर जाणाऱ्या बेस्ट उपक्रमातील वाहतूक आणि विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे महापालिका आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अनेक अडचणींचा सामना करून कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारात कपातीच्या सूचना देण्यात आल्यामुळे नाराजी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT