esakal | "साहब मै मजदूर हूं और मजबूर हूं", डोळ्यात पाणी आणणारा एक माफीनामा...
sakal

बोलून बातमी शोधा

"साहब मै मजदूर हूं और मजबूर हूं", डोळ्यात पाणी आणणारा एक माफीनामा...

अंपग मुलासाठी त्या मजूराने चोरली सायकल, चोरीसाठी माफीतली माफी 

"साहब मै मजदूर हूं और मजबूर हूं", डोळ्यात पाणी आणणारा एक माफीनामा...

sakal_logo
By
विनोद राऊत

"नमस्ते जी, 
साहब मै मजदूर हू और मजबूर हूं
आपकी सायकल ले कर जा रहा हूं 
हो सके तो मुझे माफ कर देना ..."

हे शब्द आहेत, घरी जाण्यासाठी व्याकूळ झालेल्या उत्तर प्रदेशच्या मोहम्मद इकबालचे. राजस्थानमध्ये मजूरी करत असलेल्या इकबालने आपल्या घरी पोहोचण्यासाठी एकाची सायकल चोरली. लॉकडाऊनमुळे इकबालने रोजीरोटी गमावली. उपाशी मरण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत घर गाठायचे असा निर्धार त्याने केला. मुलगा अंपग, त्यासाठी त्याला साहब सिंह यांची सायकल चोरावी लागली.

लॉकडाऊनच्या काळात इकबालसारख्या हजारो श्रमीक शक्य होईल त्या मार्गाने घरी जायला निघाले आहेत. डोक्यावर आग ओकणारा सुर्य, खिशात पैसै नाही, पायात चप्पल नाही, हातात सामान, कडेवर मुलं घेऊन पायपीट करणाऱ्या हजारो कामगारांचे थवेच्या थवे सर्वचं महामार्गावर दिसत आहे. काही कामगारांकडे सायकल होती, ते सायकलवरुन शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहेत. मात्र या इकबालकडे साधी सायकलही नव्हती.

Lockdown4.0 : चौथ्या लॉकडाऊनमध्ये होणार 'हे' मोठे बदल...

मोहम्मदला उत्तरप्रदेशला त्याच्या घरी जायचे होते. दुसरा कुठलाच मार्ग नसल्याने त्याने साहिब सिंह यांची सायकल चोरण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रामाणिकपणे श्रम करणाऱ्या या मजूराला या कृत्याबद्दल खूप लाज वाटली, पश्चाताप झाला.

इकबालने सायकलचा मालक साहब सिंह यांच्यासाठी एक चिठ्ठी सोडली. साहब सिंहला  सफाई करतांना ही चिठ्ठी मिळाली, या पत्रात मोहम्मद लिहीतो

साहेब, मी मजूर आहे, मजबूरही आहे. मी तूमचा अपराधी आहे. तूमची सायकल घेऊन जात आहे. मला माफ करा. मला बरेली पर्यंत जायचे आहे. दुसरे कुठले साधन माझ्याकडे नाही. माझा मुलगा अपंग आहे. तो चालू शकत नाही. त्यासाठी मला तूमची सायकल  घेऊन जावी लागत आहे.

हेच ठरू शकतं कारण कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेचं, धारावीतल्या 'हाय रिस्क' झोनमधले कामगारही...

इकबालची चिठ्ठी वाचून  सायकल मालक, साहब सिंग यांच्या डोळ्यात पाणी आले. सायकल चोराबद्दल मनात खूप संताप होता. मात्र मला आज मला बर वाटते. माझ्या मनात इकबालबद्दल द्वेष नाही. उलट माझी सायकल,  दुखाचा डोंगर पार करण्यासाठी इकबालच्या कामी येऊ शकली याचे समाधान मला आहे. असं साहब सिंह यांनी म्हटले आहे. इकबाल प्रामाणिक माणूस आहे. सायकल सोडून त्याने दुसऱ्या कुठल्याही वस्तूला हात लावला नाही.

confession letter written by migrant worker after stealing cycle read emotional story