BJP MLA Tamil Selvan esakal
मुंबई

Mumbai Court : अधिकाऱ्यांना मारहाण करणं भोवलं! भाजप आमदाराला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सेल्वन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

तामिळ सेल्वन आणि इतर चार आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले.

मुंबई : महापालिका अधिकाऱ्यांवर (Mumbai Municipal Corporation) हल्ला केल्याप्रकरणी भाजप आमदार तामिळ सेल्वन (BJP MLA Tamil Selvan) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी सोमवारी तमिळ सेल्वन यांना शिक्षा सुनावली.

सेल्वन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती मिळत आहे. तामिळ सेल्वन आणि इतर चार आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले. खटल्यादरम्यान सहायक पोलिस आयुक्तांसह १३ पोलिस कर्मचाऱ्यांनी न्यायालयात साक्ष दिली होती.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी २०१७ मधील महापालिका निवडणुकीपूर्वी सायन कोळीवाडा भागातील पंजाबी कॉलनीची तपासणी केली होती. त्यानंतर काही बेकायदा वीज आणि पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय घेतला. महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यांच्या कामात मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांची एक टीम त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आली होती.

जेव्हा टीम पंजाबी कॉलनीत पोहोचली तेव्हा त्यांना काम करण्यापासून रोखण्यात आले. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात आरोपी सेल्वनने सुमारे एक हजार लोकांच्या जमावाचे नेतृत्व केले होते. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा पाचारण केल्यानंतरच गर्दीवर नियंत्रण मिळवता आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT