ST bus
ST bus 
मुंबई

बेस्टसोबत धावणाऱ्या एसटी बसेसची सेवा आजपासून बंद

शर्वरी जोशी

मुंबई : कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गासमोर बेस्ट वा अन्य वाहतुकीचाच पर्याय उपलब्ध होता. परंतु, याकाळात बेस्टलवरही मोठ्या प्रमाणावर भार पडत होता. तर दुसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होत होती. त्यामुळेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी एसटीचे कर्मचारी धावून आले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईकरांची सेवा करत होते. मात्र, आजपासून (१४ जून) एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या चालक-वाहकांचे ट्विटच्या माध्यमातून जाहीर आभार मानले आहे. (buses-of-state-transport-who-were-in-mumbai-amid-corona-pandemic-will-be-stop-from-14-june-information-given-by-anil-parab)

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोना काळात प्रवासी वाहतुकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्सप्रमाणे एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्‍यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यावर धावत होत्या. त्यासाठी राज्यातील विविध आगारातील सुमारे चार हजार चालक व वाहक मदतीला धावून आले होते. मुंबईतील रस्त्यांची माहिती नसतानाही त्यांनी अगदी कौशल्यपूर्ण आपले कर्तव्य पार पाडले.

एसटीच्या चालक-वाहकांच्या आरोग्याचा विचार करत मंत्री ॲड. अनिल परब यांनी एसटीच्या वर्धापनदिनी बेस्टच्या सेवेतून सर्व बसेस बंद करीत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बेस्टच्या सेवेतून उर्वरित सर्व एसटीची सेवा रविवारपासून बंद करण्यात आल्या. परगावातून मुंबईत येत येथील परिस्थितीशी जुळवून घेत वेळप्रसंगी अडी-अडचणीवर मात करत मुंबईकरांसाठी सेवा देणाऱ्या चालक, वाहक व व्यवस्थेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे मंत्री परब यांनी आभार मानले. तुमच्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळेच एसटीचा मान व विश्वास वाढतो, असे कौतुकौद्गारही त्यांनी काढले आहे.

संपादन : शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT