मुंबई

सिमेंट कॉंक्रीटच्या 235 रस्त्यांवर भेगा 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे काही दिवसांतच पश्‍चिम उपनगरांत सिमेंट कॉंक्रीटच्या 235 रस्त्यांवर भेगा पडल्याचे समोर आले आहे. या रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिका तब्बल सहा कोटी 19 लाख रुपयांचे कंत्राट देणार आहे. 

मुंबईत 1989-90 पासून पश्‍चिम उपनगरातील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली. आतापर्यंत अनेक मुख्य रस्त्यांसह जोडरस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. या कॉंक्रीटच्या रस्त्यांवर दर 45 मीटर अंतरावर प्रसरण सांधे (एक्‍सपान्शन जॉईंट) आणि "डमी जॉईंट' व इतर सांधे असतात. मुंबईत 2007-08 पूर्वी बांधलेल्या रस्त्यांवरील हे सांधे उघडे पडले आहेत. या सांध्यांमधून पाणी जमिनीत झिरपून रस्ते खचण्याची भीती असल्यामुळे ते बुजवण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. 

पश्‍चिम उपनगरांत एकूण 235 जुन्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांचे सांधे भरणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने या कामासाठी सहा कोटी 19 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार करून निविदा मागवली होती. त्यामध्ये स्पेको इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीने 34 टक्के कमी बोली लावून हे काम सहा कोटी 19 लाख रुपयांना मिळवले आहे. 

कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह 
मुंबईत काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नव्या डांबरी रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नव्याने बनवलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडल्यामुळे या कामांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. आता पश्‍चिम उपनगरांतील सिमेंट कॉंक्रीटच्या 235 रस्त्यांवर भेगा पडल्याचे आढळले आहे. कॉंक्रीटच्या रस्त्यांवरील भेगा भरण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT