मुंबई

बालकाला मिळाले जीवदान 

सकाळवृत्तसेवा

मुलुंड - शिनबोन या हाडांच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रासलेल्या इराकच्या आठ वर्षीय मुलावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात करण्यात आलेली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हुसेन मोहम्मद असे या मुलाचे नाव आहे. 

शिनबोन या आजारात शरीरातील हाडांवर गंभीर परिणाम होतो. हळूहळू ही व्याधी शरीरात पसरत जाते. सुरुवातीला इराकच्या डॉक्‍टरांनी हुसेनला इविंग्ज सर्कोमा झाल्याचे सांगितले. केमोथेरपीनंतरच्या उपचारांना हुसेनने चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने डॉक्‍टरांनी त्याच्या पायाचे ऍम्पुटेशन (अवयव कापून टाकणे) करावे लागेल, असे सांगितले. तेव्हा घाबरलेल्या पालकांनी हुसेनला पुढील उपचारांसाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयाचे ऑर्थोसर्जन डॉ. हरेश मंगलानी व डॉ. रूपल छेडा यांनी हुसेनच्या आजाराचा अभ्यास केला आणि त्यानंतर "एक्‍स्ट्राकॉर्पोरियल रेडिएशन थेरपी' या उपचारपद्धतीत अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. त्यामुळे हुसेनला नवे आयुष्य मिळाले. 

एक्‍स्ट्राकॉर्पोरियल रेडिएशन थेरपी 
"एक्‍स्ट्राकॉर्पोरियल रेडिएशन थेरपी' या या उपचारपद्धतीत रुग्णाचे व्याधीग्रस्त हाड शरीरातून पूर्णपणे बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. नंतर त्यावर रेडिएशन थेरपी करून, त्या हाडाचे पुन्हा शरीरात प्रत्यारोपण केले जाते. 

"एक्‍स्ट्राकॉर्पोरियल रेडिएशन थेरपी' या उपचारपद्धतीत कर्करोगाच्या पेशी मारून, त्यांचा प्रादुर्भावही थांबवला जातो. हुसेनच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. सहा महिन्यांनंतर त्याला पुन्हा तपासणीस बोलावण्यात आले आहे. हुसेन काही दिवसांत पूर्णतः बरा होऊन, सामान्यांप्रमाणे आयुष्य जगू शकेल. 
- डॉ. हरेश मंगवानी, ऑर्थोसर्जन, फोर्टिस रुग्णालय 

"फोर्टिस'च्या तज्ज्ञ डॉक्‍टरांमुळे माझ्या मुलाला नवे आयुष्य मिळाले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. 
- मकबुला मोहसीन, हुसेनची आई 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT