khartan road 
मुंबई

सिमेंटचा रस्ता तब्बल 20 फूट खचला; ठाण्यातील खारटन रोडवर मोठी दुर्घटना टळली...

सकाळवृत्तसेवा

ठाणे : नेहमीची येतो पावसाळा म्हणतात, पण मुंबई तसेच परिसरात पावसाळा सुरु झाल्यावर रस्त्त्यात खड्डे पडायला सुरुवात होते. हे पडायला सुरुवात झाल्यावर सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्याची मागणी केली जाते, पण ठाण्यातील काँक्रिट रस्त्याच खचला आहे. ठाण्यातील खारटन रोड परिसरातील शीतलामाता मंदिराजवळ रविवारी दुपारच्या सुमारास रस्ता खचल्याची घटना घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर पालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रस्ता खचलेल्या भागात मार्गरोधक लावून वाहतूक बंद केली. दरम्यान, या खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी केली आहे. 

ठाणे शहरात शनिवारपासून (ता. 4) सुरू झालेला पाऊस रविवारीही कायम होता. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यात ठाणे येथील खारटन रोड परिसरातील शीतलामाता मंदिराजवळ सिमेंट काँक्रीटचा रस्ता दुपारी 20 फूट खोल खचला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

खारटन रोड हा ठाणे पूर्व व पश्चिमेला जोडणारा रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, टाळेबंदीमुळे या रस्त्यावर अत्यावश्यक सेवेसह महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनांची वाहतूक सुरु असल्याने या ठिकाणी तशी वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अल्ट्रा व्हाईट थिन टॉपिंग असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती सुरु झाली आहे. त्यासाठी तीन ट्रक वाळूही मागवण्यात आली आहे आणि रस्त्याचा पाया भक्कम करण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, मो. ह. विद्यालयाजवळील नाल्यावर असलेले झाडे खूपच जीर्ण झाले होते. ते पडताना नाल्याशेजारील संरक्षक भिंतही पडली असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel - Iran War मध्य आशियात युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर हल्ला, देशात आणीबाणी लागू; एअरस्पेस बंद, सर्व शाळांना सुट्टी

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

Mumbai Goa Highway Delay : कोकणवासीयांचा संताप! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; बड्या ठेकेदारांना ठोठावला तब्बल 16 कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : चेंबूरमध्ये धक्कादायक घटना, इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

PG Portal : सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारून वैतागलाय? घरबसल्या 'इथे' करा कोणत्याही विभागाची तक्रार; थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचेल तुमचं म्हणणं

SCROLL FOR NEXT