garbage
garbage sakal
मुंबई

Mumbai News : स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविणा-यांवर क्लिनअप मार्शल करणार दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कुठेही कचरा टाकणे, थुंकणे, मुंबईकरांच्या अंगवळणी पडले आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो. त्यामुळे पावसाऴ्यात नाले तुंबून पूर परिस्थिती निर्माण होते. रस्त्यालगत डेब्रीज टाकले जाते. मुंबई अस्वच्छ होते. सद्या मुंबईत स्वच्छता मोहिम सुरू आहेत. आता स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविणा-यांवर येत्या 22 जानेवारीपासून दंडात्मक कारवाई होणार आहे. क्लिनअप मार्शल यांच्या मार्फत कठोर कारवाई सुरू होणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी-उघड्यावर थुंकणे, नैसर्गिक विधी करणे, कचरा-अस्वच्छता करणार्‍यावर कारवाई करून क्लिनअप मार्शल दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अस्वच्छता पसरवणार्‍यांवर कारवाई २०० रुपयांपासून १ हजारांपर्यंत कारवाई होऊ शकते. क्लिन अप मार्शल हे जमा केलेल्या दंडात अपरातफर करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे कंत्राटदाची मुदत संपल्यामुळे कंत्राट रद्द केले होते. आता पुन्हा क्लिन अप मार्शल यांना कंत्राट दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. त्या अभियानाला आता मार्शलची जोड मिळणार आहे. आतापर्यंत स्वच्छतेचे अभियान सुरू असताना दंड आकारला जात नव्हता. येत्या 22 जानेवारीपासून स्वच्छता अभियानाला वेग येईल अशी माहिती पालिकेने दिला.

अर्धी रक्कम पालिकेला मिळणार

सार्वजनिक घाण करणा-यांवर क्लिनअप मार्शलकडून कारवाई करून दंड वसूल केला जाणार आहे. यामध्ये २०० रुपयांपासून १ हजारांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे. अस्वच्छतेसाठी आकारलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला तर अर्धी रक्कम पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे पालिकेला महसूलात भर पडणार आहे.

दंड ऑनलाईन

‘क्लिन अप मार्शल’कडून दंड वसूल करताना नियम मोडणार्‍यांसोबत वादावादीचे प्रसंग यापूर्वी घडले आहेत. तसेच दंडाच्या रक्कममध्ये अपरातफर होत असल्याने आता वसूल होणारा दंड ऑनलाईन होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT